second season of samantar marathi web serise production start in panchgani 
मनोरंजन

 'सुदर्शन चक्रपाणीचे काय होणार, त्याचं भविष्य त्याला कळणार' ; समांतर भाग 2

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या कथेनं आणि त्याच्या सादरीकरणानं सर्वांना जिंकून घेणारी वेबसीरिज म्हणजे समांतर वेबसीरीज. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय झालेली ही वेबसीरीजच्या पहिल्या भागाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. आता त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांसमोर येत आहे.

या मालिकेचे सिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे जोरदार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते.  वेब रीसीजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज काम करत आहेत. पहिल्या भागातील त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘समांतर’च्या पहिल्या सिझनला अर्थात पर्वाला प्रेक्षकांनी पसंद केले. प्रेक्षकांना आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज भूमिकेत आहेत.

स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्याच्या चाहत्यांना ती खूप आवडली होती. या सर्वच कारणांनी या वेब सिरीजबद्दलची रसिकांची उत्सुकता  शिगेला पोहचली आहे.दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी,  तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर यावेळी निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदारसुद्धा हजर होते.

पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणाले, “समांतर’ ही आमची निर्मिती असलेली पहिली वेब सिरीज आहे. मराठी प्रेक्षक हा कथेच्या बाबतीत फार चोखंदळ असतो. सुहास शिरवळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असल्याने ती रेसिकांना खूप आवडली. 

सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज आधारित आहे.  यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जगून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो. स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या ‘कृष्ण’ (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT