Shah Rukh Khan Dunki  esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Dunki : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख शिर्डीत दाखल! साईबाबांच्या चरणी लीन

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा डंकी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होतो आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Dunki : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा डंकी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होतो आहे. त्यानिमित्तानं तो देशभरातील महत्वाच्या देवस्थानाला भेट देत असल्याचे दिसून आले आहे. आता तो शिर्डीतील प्रसिद्ध देवस्थान साईबाबांच्या भेटीला आल्याचे बोलले जात आहे.

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान हा सध्या शिर्डी विमानतळावर दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी त्याच्यासोबत डंकी चित्रपटातील टीमही असल्याची माहिती आहे. यापूर्वी शाहरुखनं महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर तो आता शिर्डीत आला आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये शाहरुख,त्याची लेक सुहाना खान आणि शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी असल्याचे दिसत आहे.

या अगोदर शाहरुख खान पठाण' आणि 'जवान' रिलीज होण्यापूर्वी शाहरुख माँ वैष्णो देवीच्या दरबारात गेला होता. हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. त्यामुळे आता डंकी चित्रपट देखील ब्लॉकबस्टर ठरेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. डंकी चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर हा सिनेमा 21 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.

Pooja Sawant Love Story: "मला त्याचं स्थळ आलं आणि.." कशी आहे पूजा सावंतची लव्हस्टोरी?

या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल सह अनेक कलाकारांनी 'डिंकी'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बोमन इराणी, सतीश शाह, दिया मिर्झा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. डंकी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या 'सालार'शी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT