Shweta Tiwari with daughter Palak Tiwari Google
मनोरंजन

मुलीच्या शरीरावर टीका करणाऱ्यांना श्वेता तिवारीचा पलटवार

श्वेता तिवारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते.

प्रणाली मोरे

श्वेता तिवारी(Shweta Tiwari) हे छोट्या पडद्यावरचं चर्चेतलं नाव. तिच्या अभिनयापेक्षाही अधिक ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळेच चर्चेत राहिली. तिनं वयाच्या १९ व्या वर्षी टी.व्ही अभिनेता राजा चौधरी याच्याशी विवाह केला. वयाच्या २० व्या वर्षी तिनं मातृत्वाची जबाबदारीही स्विकारली. पलक तिवारी ही श्वेता आणि राजा चौधरीची मुलगी आहे. पण राजा चौधरीवर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप करीत श्वेतानं त्याच्यापासून काडीमोड घेतला. त्यानंतर काही वर्षांनी तिनं दुसरं लग्न टी.व्ही अभिनेता अभिनव कोहलीशी केलं,तिला रियांश हा मुलगा झाला. पण पुन्हा तिच्या दुसऱ्या लग्नाचेही तीनतेरा वाजले अन् तिचा दुसरा घटस्फोट झाला. आज पलक आणि रीयांश आपल्या दोन मुलांसोबत ती वेगळं राहतेय. पण अधनं-मधनं अभिनव या तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत मुलाच्या कस्टडीवरनं तिचे खटके उडताना दिसतातच. पण आता श्वेता चर्चेत आलीय ती तिची मुलगी पलकमुळे. काय झालंय नेमकं ज्यामुळे श्वेताच्या रागाचा पारा चढलाय.

आजपर्यंत श्वेतावर अनेक कारणांमुळे टीकाकारांनी ताशेरे ओढले पण अनेकदा श्वेता मूग गिळून शांत बसली. पण आता पलकविरोधात टीकेचा घाणेरडा सूर उमटल्यावर एक आई कशी बरं शांत बसेल. श्वेतानं पलकवर टीका करणाऱ्यांना,तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. पलक तिवारीला सोशल मीडियावर ट्रोल करताना 'कुपोषित' म्हणून संबोधलं आहे. यावर श्वेतानं नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली,''लोक मला म्हणतात ही किती बारिक आहे. पण जोवर पलक निरोगी आहे,तिची तब्येत व्यवस्थित आहे,मला पर्वा नाही कोण तिच्या शरीरयष्टीवरनं तिला काय म्हणत आहेत याची. आजकाल इन्स्टाग्रामवर लोकांना ट्रोल करण्याशिवाय काम काय आहेत. लोक तिला कुपोषित,सुकडी म्हणतात आणि बरंच काय काय म्हणतात माहीत नाही,पण मी या सगळ्याची पर्वा करीत नाही''.

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी २१ वर्षांची आहे. पलकने मागच्याच वर्षी हार्डी संधूचा म्युझिक व्हिडीओ 'बिजली बिजली' मधनं एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. लवकरच ती विशाल मिश्राच्या 'रोझी: द सॅफरॉन चॅप्टर'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT