Sonakshi Sinha Bollywood actress purchased new home esakal
मनोरंजन

Sonakshi Sinha : 'दबंग गर्ल'नं मुंबईत समुद्रकिनारी घेतलं घर! किंमत ऐकून व्हाल थक्क, मोजले 'एवढे' कोटी

यानंतर सोनाक्षीनं जेवढे चित्रपट केले त्यातून तिच्या वाटयाला प्रेक्षकांकडून कौतुक आले.

युगंधर ताजणे

Sonakshi Sinha bollywood actress purchased new home : सलमान खानसोबत दबंगमध्ये दिसलेल्या सोनाक्षीची गोष्टच वेगळी आहे. तिला सलमान खानच्या चित्रपटामधून पहिल्यांदा ब्रेक मिळाला. तिनं त्या संधीचे सोने केले. यानंतर सोनाक्षीनं जेवढे चित्रपट केले त्यातून तिच्या वाटयाला प्रेक्षकांकडून कौतुक आले. तिचा लुटेरा चाहत्यांना आवडला होता.

गेल्या दशकभरापासून बॉलीवूडमध्ये अॅक्टिव्ह असलेल्या सोनाक्षीनं आता मुंबईच्या समुद्रकिनारी घर घेतल्याची बातमी समोर आली आहे. त्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. सोनाक्षीचं नवं घर पाहताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोनाक्षीनं मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये एका अपार्टमेंटमध्ये घर खरेदी केलं आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

सोनाक्षीनं खरेदी केलेल्या घराची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तब्बल अकरा कोटी देत सोनाक्षीनं ते घर खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोनाक्षीनं जे घर खरेदी केलं आहे तिथुन समुद्राचा दिसणारा जो व्हयू आहे तो खूपच सुंदर असल्याचे बोलले जाते. सोनाक्षीचा फ्लॅट हा २६ व्या मजल्यावर आहे. तब्बल २ हजार २०८ स्क्वेअर फुटच्या या फ्लॅटचे इंटेरिअर देखील खुपच छान आहे.

ऑफिशियल डॉक्युमेंटनुसार सोनाक्षीनं ५५ लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. तर ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी दिली आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये तिनं ही खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे. २०२० मध्ये देखील सोनाक्षीनं १४ कोटींना बांद्रयामध्ये एका घराची खरेदी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT