wedding cha shinema
wedding cha shinema 
मनोरंजन

'वेडिंगचा शिनेमा'मधील “उगीचच काय भांडायचंय? रिलीज

सकाळवृत्तसेवा

मुंबई : प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी लिहिले असून त्यांनीच ते गायले सुद्धा आहे.

आपल्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण नेहमीच आणि उगीचच भांडत असतो, त्या भांडण्याला काही कारण पण नसते, पण उगीचच आपण सगळ्यांन बरोबर भांडत असतो. हेच या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट 12 एप्रिलला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’मधील सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय?...” हे गाणेही त्यातीलच एक आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT