wedding cha shinema
wedding cha shinema 
मनोरंजन

'वेडिंगचा शिनेमा' मधील 'माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं' रिलीज

सकाळवृत्तसेवा

मुंबई : संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी कवी संदीप खरे यांनी लिहिली आहेत, म्हणूनही या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटाचे तिसरे गाणे “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं....” प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे डॉ. सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर याने गायले आहे.

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गावून देतात. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं....माझ्या मामाच्या लग्नाची गेली बातमी वाऱ्याला...” हे गाणे निर्मात्याने नुकातेच प्रकाशित केले. 14 वर्षीय शुभंकर सलील कुलकर्णी याने हे गाणे गायले आहे. त्याने वयाच्या केवळ सातव्या वर्षी ‘चिंटू’ या मराठी चित्रपटात पहिले गाणे गायले होते. ‘वेडिंगचा शिनेमा’मधील या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे. प्रसेनजीत हा जेव्हा ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये सहभागी झाला होता त्यावेळी डॉ सलील कुलकर्णी हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते. त्यांनी प्रसेनजीतला त्यावेळी स्वतंत्र गाणे गाण्याची संधी देण्याचा शब्द दिला होता, तो या माध्यमातून पूर्ण केला आहे.

पारंपारिक रितीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिलला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, आलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. याआधी प्रकाशित करण्यात आलेल्या याधीच्या दोन्ही गाण्यांना आणि टीझरला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT