मनोरंजन

राज्य नाट्य स्पर्धाः सेलीब्रिटींच्या उपस्थितीत रंगला कौतुक सोहळा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. 

तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने "मराठी नाटकांची एकशे पंचाहत्तरी' या सांस्कृतिक कार्यक्रमातून मराठी रंगभूमीचा प्रवास उलगडत गेला. विविध नाट्यप्रसंगासह गीत, नृत्याच्या सुरेख मिलाफातून 1883 ते 2018 या एकशे पंचाहत्तर वर्षातील मराठी नाटकांचा हा सारा प्रवास सर्वांनाच भावला.

सुनील देवळेकर यांची संकल्पना व दिग्दर्शन होते तर अविनाश नारकर, ऐश्‍वर्या नारकर, संतोष पवार, प्रणव रावराणे, प्रभाकर मोरे, पोर्णिमा अहिरे-केंडे, विक्रांत आजगावकर, संदीप कांबळे, अभिषेक मराठे, प्रेरणा निगडीकर, संतोष काणेकर, केदार परूळेकर, सचिन गजमल, शुभांगिनी पाटील आदींचा कलाविष्कार होता.

दरम्यान, 58 वी राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धा, सोळावी बालनाट्य, पहिली दिव्यांग नाट्य आणि 31 व्या राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्यांना कार्यक्रमात पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. शरद भुथाडिया, चंद्रकांत जोशी, पवन खेबूडकर, राजप्रसाद धर्माधिकारी, नरहर कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, सुधीर पोटे, नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, संजय तोडकर, संजय हळदीकर, सुनील शिंदे, प्रा. डॉ. शशिकांत चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. 

अनुक्रमे पारितोषिक विजेते असे... 

  • व्यावसायिक नाटक ः सोयरे सकळ (भद्रकाली प्रॉडक्‍शन्स, मुंबई- साडेसात लाख रूपये), हॅम्लेट (जीगिषा व अष्टविनायक, मुंबई- साडेचार लाख), आरण्यक (अव्दैत थिएटर, दादर- तीन लाख) 
  • हौशी मराठी ः अव्याहत (हंस संगीत नाट्य मंडळ, फोंडा- सहा लाख रूपये), ऱ्हासपर्व (परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापूर- चार लाख), द ग्रेट एक्‍स्चेंज (नगर अर्बन बॅंक स्टाफ, अहमदनगर- दोन लाख), 
  • हिंदी नाट्य ः सवेरेवाली गाडी (कलाकृती, दादर- एक लाख), बैतुल सुरूर (उद्‌गार, पुणे- साठ हजार), आओ प्यार करे (म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन, मुंबई- चाळीस हजार), आद्य भदन्त अश्‍वघोष (बहुजन रंगभूमी, नागपूर- तीस हजार), टेंडर (स्वतंत्र कला ग्रुप, पुणे- वीस हजार). 
  • संगीत नाट्य ः संगीत संत गोरा कुंभार (राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी- दीड लाख), संगीत मंदारमाला (देवल स्मारक मंदिर, सांगली- एक लाख), संगीत सन्यस्त खडगः (अमृत नाट्य भारती, मुंबई- पन्नास हजार), 
  • संस्कृत नाट्य ः वज्रवृक्षः (इंद्रधनु कलाविष्कार संस्था, मिरज- एक लाख), अनुबन्धः (संस्कृत-प्राकृत भाषा विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे- साठ हजार), शशविषाणम्‌ (सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर- चाळीस हजार). 
  • दिव्यांग बालनाट्य ः झेप (रोटरी संस्कारधाम ट्रस्ट, मुंबई- चाळीस हजार), छोट्यांनी जिंकले (इंदिरा गांधी कर्णबधीर विद्यालय, नाशिक- वीस हजार), खुड खुड (सुशीलादेवी देशमुख मुकबधीर विद्यालय, लातूर- दहा हजार). 
  • बालनाट्य ः काऊ माऊ (परिवर्तन प्रतिष्ठान, बीड- एक लाख), रिले (दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, नाशिक- साठ हजार), आकार (वैष्णवी महिला व आदिवासी विकास संस्था, अमरावती- चाळीस हजार). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT