Sunny Deol On Trolls: Esakal
मनोरंजन

Sunny Deol On Trolls: सकीनाला बोलताच तारा सिंगचा भडका! 'तुम्ही सगळे रिकामटेकडे...'

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने सोशल मीडियावर चर्चा केली. यात सनी सोशल मीडिया कल्चरबद्दल बोलला. त्याचबरोबर त्याने ट्रोल करणाऱ्यांना चांगलचं फटकारलं आहे.

Vaishali Patil

Sunny Deol On Trolls: बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल हे त्यांच्या चित्रपट गदर 2 या चित्रपटासाठी खुपच उत्सूक आहेत. लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सध्या या चित्रपटाची स्टार कास्ट गदर 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल दोघंही अनेक कार्यक्रम आणि टिव्ही शोला मुलाखती देत आहेत. अनेक कार्यक्रमांना जाऊन तो चित्रपटाबद्दल बोलत असतो.

याच मुलाखतीत सनी देओलचे अनेक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहेत. त्याने याआधी नेपोटिझम आणि बॉलिवूडमधील अनेक प्रश्नावर उत्तर दिलीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने सोशल मीडियावर चर्चा केली.

त्यातच पाकिस्तानातुन भारतात आलेली सीमा हैदर हिच्यावर देखील सनीनं प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा सनीचं अशाच एका मुलाखतीतील वक्तव्य चर्चेत आलं आहे.

गदर सिनेमासाठी आमिषा पटेलला खुप ट्रोल करण्यात आलं होत त्यानंतर आता आमिषाच्या बचाव करत सनीनं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यातच गदर 2 बद्दल स्पॉयलर दिल्याबद्दल अमिषा पटेल खुपच ट्रोल झाली होती.

गदर 2 ची अभिनेत्री सिमरत कौर हिला देखील तिच्या मागील चित्रपटात इंटिमेट सीन दिल्याने ट्रोल करण्यात आले होते. सिमरतला सोशल मीडियावर खूप ट्रोलचा सामना करावा लागला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने सोशल मीडियावर चर्चा केली. यात सनी सोशल मीडिया कल्चरबद्दल बोलला. सनीने या सर्व प्रकरणावर दिली आहे. या विषयी बोलतांना सनी बोलला, 'सोशल मीडियावर रिकामटेकडे (वेल्ले) लोक असतात. ज्यांना काम काही नाही, त्यांच्याकडे एक खेळणं आलं आहे. ते काय लिहितात याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना थोडीच त्यांचा सामना करावा लागतो. त्यांना तर खुप मजा येत असते.'

पुढे सनी म्हणतो की, 'तुम्ही कसे आहात आणि कसे नाहीत हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहीत असतं. तुम्ही कमेंट वाचू नका. आजकाल लोक वेस्टर्न कल्चरला फॉलो करतात. त्याला नीट न समजता त्याचा वापर करु लागतात.'

गदर 2 मध्ये सनी देओल, अमिषा पटेल, सिमरत कौर आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT