Swapnil Joshi shared video talks about love and his role  sakal
मनोरंजन

Swapnil Joshi: प्रेम ठरवून करता येत नाही.. स्वप्नील जोशीचा तो व्हिडिओ होतोय व्हायरल..

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत स्वप्नीलने त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडी सांगितल्या.

नीलेश अडसूळ

swapnil joshi : मराठीतील एक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ख्याती असलेला अभिनेता स्वप्नील जोशी, सध्या बराच चर्चेत आहे. मध्यंतरी केलेली पायी वारी असो, 'चला हवा येऊ द्या' मध्ये विशेष भूमिका असो किंवा 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील सौरभ पटवर्धन. स्वप्नील हा कायमच प्रेक्षकांना भावाला आहे. विशेष म्हणजे यशाच्या इतक्या मोठ्या शिखरावर असूनही तो सर्वांशी आपुलकीने वागताना दिसतो. आज त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत.

(Swapnil Joshi shared video talks about love and his role)

मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या अभिनेता स्वप्नील जोशी याने लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम केले आहे. आजवर त्याने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रत्येक भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली आहे आणि प्रत्येक भूमिकेतून त्यातून तो काही तरी शिकत आला आहे, याच विषयी तो एका मुलाखतीत बोलला आहे. नुकतीच त्याने ही मुलाखत सोशल मिडियावर शेयर केली आहे.

स्वप्नीलने अभिनयाची सुरुवात वयाच्या नवव्या वर्षी केली. त्याने रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या टीव्ही मालिकेत रामपुत्र कुशची भूमिका साकारली होती. तिथूनच त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर त्याने रामानंद सागर यांच्याच ‘श्रीकृष्ण’ या हिंदी मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका केली होती. स्वप्नीलच्या या दोन्ही भूमिका चांगल्या गाजल्या होत्या. त्याशिवाय एका लग्नाची दुसरी गोष्ट, मुंबई पुणे मुंबई,मितवा, तु ही रे अशी न संपणारी लिस्ट आहे.

२०१३ साली संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील स्वप्नीलच्या अभिनयाने लोकांचा मनात कायमचं घर केलं आहे.

एका मुलाखतीत अमृता खानविलकरने स्वप्नीला त्याच्या वेग वेगळ्या भूमिकेतून तो काय शिकला हा प्रश्न विचारला, स्वप्नीलने मस्त उत्तर दिले, " एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या घणाने मला साधेपणा शिकवला, दुनियादारीतल्या श्रेयस ने मैत्री.. दुनियादरी शिकवली.

मुंबई पुणे मुंबई मधल्या गौतमने 'प्रेम म्हणजे काय? प्रेम हे सांगून होत नाही.. आणि प्रेम हे ठरवून करता येत नाही' ही शिकवलं आणि सर्वात महत्वाचं मी श्री कृष्णाच्या भूमिकेतून शिकलो ते म्हणजे 'आताच क्षण जगून घ्या.. पुढे काय होईल ही आपल्याला सांगता येत नाही. " स्वप्नीलचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT