Tarak Mehta Ka Ulta Chashmah
Tarak Mehta Ka Ulta Chashmah 
मनोरंजन

Taarak Mehta Kka Chhota Chashmah: पुन्हा दयाबेनची इंट्री?

सकाळ डिजिटल टीम

Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं मोठमोठे विक्रम केले त्यात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचं योगदान (Tarak Mehta Ka Ulta Chashmah) मोठं आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग या मालिकेनं निर्माण केला आहे. आजही देशातील सर्वाधिक लोकप्रिय (Tv entertainment) मालिकेच्या यादीत तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचं नाव घेतलं जातं. या मालिकेतील कलाकारही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असतात. त्यांच्या नावाची चर्चाही होत असते. काही दिवसांपूर्वी मालिकेतून दयाबेन आऊट झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. मात्र आता त्या पुनरागमन करणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. (Taarak Mehta Kka Chhota Chashmah animated version)

सोशल मीडियावर सध्या तारक मेहता का छोटा चष्मा या ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. (Taarak Mehta Kka Chhota Chashmah On Netflix) ओटीटीवरुन हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. अॅनिमिटेड या शो चे पोस्टर सोशल मीडियावरुन व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. हा बदल म्हणजे तारक मेहताच्या प्रेक्षकांसाठी मोठं आगळं वेगळं सरप्राईज असणार आहे. गेल्या 13 वर्षांपासून हा शो लोकांचे मनोरंजन करत असून त्याची लोकप्रियता सातासमुद्रापार देखील गेली आहे. या मालिकेतील प्रमुख पात्र जेठालाल, दया बेन, बिक, बाबूजी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतात. रियल लाईफमध्ये देखील त्यांची क्रेझ कायम आहे.

तारक मेहताच्या मालिकेचा अॅनिमेटेड शो आता प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. आज पासून तो प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तारक मेहताच्या नव्या व्हर्जनचे वेध प्रेक्षकांना लागले होते. या सीरिजमध्ये गोकुळधाम सोसायटीमध्ये जे सहभागी रहिवाशी आहेत तेच सीरिजमध्येही दिसणार आहे. या शो चे निर्माते असित कुमार मोदी असून तारक मेहताच्या चाहत्यांना या शो चे नवे व्हर्जन आता नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT