Nidhi Bhanushali
Nidhi Bhanushali  file image
मनोरंजन

'सोनू तुला काय झालंय?'; तारक मेहतामधील निधी झाली ट्रोल

प्रियांका कुलकर्णी

गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah. तारक मेहता मधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेतील सोनालिका ऊर्फ सोनूची भूमिका साकारणारी निधी भानुशाली Nidhi Bhanushali आठवतेय का? मालिकेत आत्माराम भिडे मास्तरांच्या मुलीची भूमिका साकारणारी निधी सोशल मीडियावर सक्रिय असते. निधीचे सोशल मीडियावरील फोटो अनेकदा चर्चेत असतात. नुकतेच तिने एक फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो निधीने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमधील मेक-अपमुळे निधीला अनेकांनी ट्रोल केले आहे.

निधीने पिंक कलरच्या टॉपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील निधीच्या मेक-अप आणि हेअर स्टाईलमुळे तिला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. फोटोला निधीने कॅप्शन दिले, 'आपले मन हे आकाशापलीकडे विस्तारत जाणारा सुंदर रंगांचा प्रवाह आहे'. निधीच्या या फोटोला अनेकांनी विनोदी कमेंट करत तिला ट्रोल केले. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'सोनू तुला काय झाले आहे?' तर दुसरा म्हणाला, 'ही आधी कशी होती आणि आता कशी झाली'

निधीने 'तारक मेहता..' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत अनेक वर्षे काम केल्यानंतर 2019 मध्ये तिने मालिका सोडली. या मलिकेतील अनेक कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकले आहे. मालिकेतील जेठालाल, दया भाभी, माधवी भाभी, टप्पू किंवा सोनू या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची चर्चा सोशल मीडियावर होत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT