tamannah
tamannah 
मनोरंजन

अभिनेत्री तमन्ना भाटियाला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आढळून आली होती. तमन्ना हैद्राबादमध्ये एका वेबसिरीजचं शूटींग करत होती. या शूटींग दरम्यान तिला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवायला लागली आणि त्यानंतर तिने लगेचच टेस्ट केली तेव्हा तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला होता. आता तमन्नाने सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या आरोग्यासंबधीची अपडेट दिली आहे. 

अभिनेत्री तमन्ना भाटियाने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलंय की ती हॉस्पिटलमध्ये दाखल होती मात्र आता तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तमन्ना सांगते की हा आठवडा तिच्यासाठी अनेक अडचणींनी भरलेला होता. मात्र आता ती पहिल्यापेक्षा उत्तम आहे. 

तमन्नाने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिलंय, 'तसं तर मी आणि माझी टीम सेटवर पूर्णपणे सावधगिरी बाळगत होतो मात्र तरीही मला मागच्या आठवड्यात ताप आला. योग्य ते उपचार केल्यानंतर मी माझी कोरोना टेस्ट केली आणि दुर्देवाने ती पॉझिटीव्ह आली होती. मी स्वतःला हैद्राबादमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतलं. डॉक्टरांच्या उपचारांनंतर माझी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे आणि मला आता हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे. हा आठवडा माझ्यासाठी खूर अडचणींचा होता मात्र आता मला बरं वाटतंय. मी आशावादी आहे आणि आशा करते की लवकरंच पूर्णपणे बरी होईन. सध्यातरी मी स्लतःला सेल्फ आयसोलेट केलं आहे.'

याआधी तमन्नाने पोस्ट करत तिचे वडिल संतोषी आणि आई रजनी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कुटुंबातील सगळ्या सदस्यांसोबत तमन्नाने देखील स्वतःची टेस्ट केली होती.   

tamannaah bhatia discharged from hospital after covid 19 tested negative  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT