मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा (tarak mehta ka ulta chashma ) ही मालिका भारतीय मनोरंजन विश्वामध्ये (entertainment) सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका आहे. या मालिकेचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या दोन दशकांपासून या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेतला आहे. ती कमालीची लोकप्रिय मालिका असून त्या मालिकेतील पात्रांशी प्रेक्षकांचं एक अनोख नातं तयार झाले आहे. सध्या या मालिकेतील प्रमुख कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी (dilip joshi) यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. लग्नामध्ये तिनं जो पेहराव केला होता त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्या डोक्यावरील पांढरी केसं हा तेव्हा सर्वात चर्चेतला मुद्दा होता. त्यावर तिनं स्वतंत्रपणे एक पोस्ट देखील लिहिली होती.
आता जेठालाल (jethalal) यांनी त्या पेहरावावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या त्या प्रतिक्रियेनं प्रेक्षक, वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. इ टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जेठालाल यांनी आपल्या मुलीच्या त्या पेहरावाचं कौतूक केलं आहे. ते म्हणाले, मला त्यामध्ये काहीही गैर वाटलं नाही. मुळात त्यात चूकीचं असं काय होतं की जेणेकरुन ती गोष्ट लोकांना खटकली. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीवरुन एखाद्याला ट्रोल केले जाते. नको त्या मुद्दयाला फार महत्वही दिले जाते. त्यामुळे त्याचा गवगवाही होते. आता जे जसं आहे तसं लोकांसमोर आल्यास त्यात गैर काय आहे अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे माझ्या मुलीनं नियती जोशीच्या हेअरस्टाईलचं मी कौतूक करतो.
आमच्यासाठी तिनं तिची हेअर स्टाईल कशी करावी हा काही फारसा महत्वाचा मुद्दा नव्हताच. आम्हाला लोकं त्यावरुन अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देतील असंही वाटलं नव्हत. मात्र तसं झालं. आणि वाईटही वाटलं. नियतीनं तिच्या पोस्टमधून तिची भूमिका मांडली होती. तिच्या ठाम भूमिकेनं अनेकजणींना प्रेरणा मिळाली ही माझ्यादृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे. असेही दिलीप जोशी यांनी यावेळी सांगितलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.