The Kerala Story  esakal
मनोरंजन

The Kerala Story च्या निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप! आता 'मी टू' वर चित्रपट तयार करणार का?

'द काश्मिर फाईल्स' नंतर आता विपुल अमृतलाल शाह यांच्या द केरल स्टोरीची चर्चा आहे. एका वेगळ्या विषयांवरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story Director Vipul Amrutlal shah : द काश्मिर फाईल्सनंतर आता विपुल अमृतलाल शाह यांच्या द केरल स्टोरीची चर्चा आहे. एका वेगळ्या विषयांवरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

द केरळ स्टोरीचा ट्रेलर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली. त्यावरुन नेटकऱ्यांमध्ये वादही समोर आला आहे. काहींनी तर या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. यासगळ्यात द केरळ स्टोरी चित्रपटाचे निर्माते आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर विपुल शाह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाची बातमी समोर आली आहे. लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ज्यांनी द केरळ स्टोरी सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यांच्यावर देखील लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानं चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर बॉलीवूडचा बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारा अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक कमाल खाननं विपुल शाह यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. शाह यांनी आता मी टू सारख्या विषयांवर चित्रपट तयार करावा. असा टोमणा मारला आहे.

विपुल शाह हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते असून त्यांनी यापूर्वी कमांडो, नमस्ते लंडन, नमस्ते इंग्लंड, एक्शन रिप्ले, ऑखे आणि वक्त सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री इलनाज नौरोजीनं मी टू चळवळीच्यावेळी शाह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT