Salman Khan : 'महिलांनी पदर सांभाळलेलाच बरा, नाहीतर..!'

पलकनं एका मुलाखतीमध्ये आपल्या चित्रपटाच्या सेटवर महिलांनी कसे कपडे परिधान करायला हवेत याची नियमावली तयार केली होती. असे सांगितले होते.
Salman Khan Kisi Ka bhai kisi ki jaan Palak Tiwari
Salman Khan Kisi Ka bhai kisi ki jaan Palak Tiwari esakal

Salman Khan Kisi Ka bhai kisi ki jaan Palak Tiwari : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. त्याच्याभोवती नेहमीच वाद फिरताना दिसतो. सलमानला जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्या यामुळे मुंबई पोलिसांकडून त्याच्या घराभोवती कडेकोट बंदोबस्त आहे. किसी का भाई किसी की जान चित्रपटाचं अपयश आता सलमानची वेगळी प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

सलमानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटामध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री पुजा हेगडे आणि टीव्ही मनोरंजन विश्वातील नावाजलेली अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीची इंट्री झाली. त्यानंतर या सेलिब्रेटींच्या नावाची चर्चा होताना दिसते आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी पलकनं एका मुलाखतीमध्ये आपल्या चित्रपटाच्या सेटवर महिलांनी कसे कपडे परिधान करायला हवेत याची नियमावली तयार केली होती. असे सांगितले होते.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पलकनं या प्रतिक्रियेवर झालेल्या वादानंतर आपण असे बोललोच नव्हतो. असे सांगून यु टर्न घेतला होता. यावर सलमाननं दिलेल्या प्रतिक्रियेनं पुरुषी मानसिकतेकडे लक्ष वेधले गेले आहे. सलमाननं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यामध्ये सलमाननं महिलांनी स्वताच्या कपड्यांविषयी अधिक काळजी घ्यायला हवी. शॉर्ट कपड्यांचा वापर टाळावा. तुम्हाला पुरुषी मानसिकतेविषयी अधिक सांगायला नको.असे सलमानचे म्हणणे आहे.

वातावरण थोडे वेगळे आहे. मी हे काही महिलांविषयी बोलत नाही. माझे म्हणणे पुरुषांविषयी आहे. ते ज्याप्रकारे महिलांकडे पाहतात त्यावरुन आपल्याला अंदाज येतोच. महिलांनी अधिक काळजी घ्यायला हवी. त्यांनी सजग राहण्याची गरज आहे. असे वक्तव्य सलमाननं केले आहे. पलकनं केलेल्या वक्तव्यावर सलमाननं पुन्हा एकदा तिची पाठराखण केली आहे.

Salman Khan Kisi Ka bhai kisi ki jaan Palak Tiwari
Salman Khan : 'मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित'!, भाईजान असं का म्हणाला?

पलक म्हणाली होती सलमाननं सेटवर डीप नेकलाईन ड्रेस परिधान करण्यास मनाई केली होती. त्याचे म्हणणे असे होते की, मुलींना कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र ज्या महिला अभिनेत्रींनी सेटवर काळजी घेण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com