Kangana Ranaut : 'ती त्यांच्या बेडरुमची गोष्ट' समलैंगिकतेवर कंगनाची हटकेच प्रतिक्रिया!

देशभरातील कोणत्याही परिस्थितीवर कंगना बोलते आणि ती तिच्या प्रतिक्रियेमुळे अनेकदा वादातही सापडली आहे.
Kangana ranaut
Kangana ranaut esakal

Kangana Ranaut actress Gender Neutrality reaction : बॉलीवूडची वाचाळ अभिनेत्री म्हणून कंगनाची ओळख आहे. देशभरातील कोणत्याही परिस्थितीवर कंगना बोलते आणि ती तिच्या प्रतिक्रियेमुळे अनेकदा वादातही सापडली आहे. आपल्या बोलण्यामुळे सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेचा कंगनाला काहीही फरक पडत नाही. तिला जे भावते आणि पटते त्यावर ती बोलून जाते.

काही दिवसांपूर्वी कंगनानं बॉलीवूडचा भाईजान सलमान खानवर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, सलमानला जीवे मारण्याची आलेली धमकी यामुळे त्याच्या घराभोवती वाढविण्यात आलेला बंदोबस्त यामुळे चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सलमाननं देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठे जाता येत नाही. ते सतत सोबत असतात. आता हा प्रोटोकॉलचा भाग आहे. असे सलमाननं सांगितले होते.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासगळ्यात कंगनाची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिनं सलमानला कुणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण आता देश मोदींच्या हाती आहे. त्यामुळे तुला काहीही होणार नाही. असे कंगना म्हणाली होती. दुसरीकडे कंगनानं आता समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाविषयी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा विषय ठरताना दिसत आहे. कुणाच्या बेडरुममध्ये काय चालले आहे याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण त्यात फारसा भाग घेऊ नये.

Kangana ranaut
Salman Khan: 25 वर्षांनंतर करण जोहर-सलमान पुन्हा एकत्र... 'टायगर 3' नंतर करणार धमाका

कुणाच्याही बेडरुमची गोष्ट ही त्याच रुमपर्यत मर्यादीत ठेवावी. म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. प्रत्येकाच्या वैयक्तिक आय़ुष्यात एवढी ढवळाढवळ करण्याची गरज नाही. शेवटी लग्न हा प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे. जेव्हा दोन हदयं एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा फारसं बोलण्यासारखं काही नसतं. अशा शब्दांत कंगनानं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

Kangana ranaut
Kangana Ranaut : 'घाबरतोस कशाला, मोदी आहेत ना?'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com