Tigmanshu Dhulia Biopic esakal
मनोरंजन

Tigmanshu Dhulia: 'फक्त पाचवी पास होते पण त्यांनी इतिहास घडवला'! 'पान सिंग तोमर' फेम 'तिग्मांशू' कोणत्या कलाकाराचा बनवणार बायोपिक?

तिग्मांशूनं (Tigmanshu Dhulia latest News) त्याच्या एका मुलाखतीमध्ये बायोपिकची घोषणा केली आहे. त्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Tigmanshu Dhulia Biopic: ज्यांनी साहेब बिवी गँगस्टर, साहेब बिवी और गँगस्टर रिटर्न्स आणि पान सिंग तोमर सारखे चित्रपट पाहिले असतील त्यांना तिग्मांशू धुलिया (Tigmanshu Dhulia Latest News) कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या तिग्मांशूनं आगामी काळात त्याच्या बायोपिकची घोषणा केली आहे.

बॉलीवूडमध्ये ज्यांना समीक्षक, प्रेक्षक आणि सिने अभ्यासकांची नेहमीच पसंती मिळते अशा दिग्दर्शकांमध्ये तिग्मांशू धुलियाचे नाव घेतले जाते. त्याचा अभिनय आणि दिग्दर्शन याच्यावर असणारं प्रभुत्व त्याच्या कामातून दिसून आले आहे. पान सिंग तोमरमधून त्यानं आपली वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली होती. तो आता एका वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या कलाकारावर बायोपिक बनविण्याचा विचार करतो आहे.

महान अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मधुबाला (madhubala) यांचा प्रसिद्ध मुघले आझम आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या चित्रपटाची मेकिंग प्रोसेस इतकी प्रेरणादायी होती की त्यावरुन खूप सारी चर्चा होत असते. त्याचे दिग्दर्शक के असिफ (Mughal E Azam Director K Asif ) यांच्याविषयी नव्या पिढीला माहिती नाही. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती तिग्मांशू करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

के आसिफ यांच्या आयुष्यावर तिग्मांशू (Tigmanshu Dhulia) चित्रपट करतो आहे असे कळताच बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. के आसिफ यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात झाला. के आसिफ यांनी त्यांच्या करिअरमध्ये केवळ दोनच चित्रपटांची निर्मिती केली होती. मात्र त्या दोन चित्रपटांमुळे त्यांचे नाव बॉलीवूडमध्ये अजरामर झाले. त्यांनी जो मुघले आझम नावाचा चित्रपट केला त्यासाठी त्यांना तब्बल तेरा वर्ष लागल्याचे सांगण्यात येते.

के आसिफ (Mughal E Azam Director K Asif ) यांचे शिक्षण केवळ पाचवीपर्यत होते. तरी देखील त्यांनी त्यांच्या कौशल्यानं चाहत्यांच्या मनावर गारुड केले. एका साहित्यिक उत्सवामध्ये सहभागी झालेल्या तिग्मांशूनं याबाबत सांगितले आहे. तो म्हणाला आपल्याकडे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यांच्याविषयी लोकांना फारसं माहिती नाही. त्या मला लोकांपर्यत पोहचावयाच्या आहेत. माझ्याकडे एक चित्रपट आहे ज्याचे नाव आसिफ असे आहे. त्याचा विषय मोठा आहे. मी हा चित्रपट भव्य स्वरुपात तयार करणार असून त्यात अभिनेता नव्हे तर तो विषय जास्त मोठा दिसेल याची काळजी घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT