Tollywood Bollywood muddy teaser  viral on social media gets 15 million views
Tollywood Bollywood muddy teaser viral on social media gets 15 million views  
मनोरंजन

'मडी' चा टीझरच इतका भारी तर चित्रपट कसा असेल...

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपटांनी वेगळा ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडच्या तुलनेत त्यांच्या चित्रपटांमध्ये कुणीही मोठा स्टार नसला तरी ते कमालीचे लोकप्रिय होताना दिसत आहे. मडीचीच गोष्ट करायची झाल्यास त्याला आतापर्यत 15 मिलियन व्हयुज मिळाले आहेत. त्याच्या टीझरलाच एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला असेल तर संपूर्ण चित्रपट कसा असेल अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदाचे वर्ष साऊथ चित्रपटांसाठी पोषक ठरते की काय असे वातावरण दिसते आहे.

मडी येत्या काळात तेलुगु, हिंदी, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. डॉ. प्रगाभल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  तसेच त्यात युवान, रिधान कृष्णा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मड्डीनं सध्या आपल्या टीझरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा प्रभाव एवढा प्रचंड आहे की त्याला अल्पावधीतच लाखो हिट्स मिळाले आहेत. चित्रपटाचा टीझर खुपच लक्षवेधी आहे. त्यामुळे तो ट्रेडिंगचा विषय आहे. सध्या टीझरही विविध भाषांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यानं 15 मिलियन व्ह्युजचे रेकॉर्ड तयार केले आहे.

जेव्हा मडी टीझर प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरु झाली. मडी ही चिखलात चालणा-या कार रेसिंगवरील देशातील पहिली फिल्म आहे. तसेच आपणही यापूर्वी न पाहिल्या गेलेल्या देशातील वेगवेगळ्या भागाचे दर्शन यानिमित्तानं होणार आहे. मडी विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेमा कृष्णदास यांनी पीके 7 क्रिएशन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या टीझरमध्ये एडिटिंग, छायांकन, संगीत यांचा उत्तम वापर पाहायला मिळतो आहे. मडीचे निर्माता लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT