Photo-8
Photo-8 
मनोरंजन

'मोगरा फुलला'चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा

स्वप्निल जोशी व नीना कुळकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला 'मोगरा फुलला' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला.

या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या भूमिकेत आहे दिसत आहे, लग्न होत नसलेला तरी आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत स्वप्नील पाहायला मिळत आहे. तर नीना कुळकर्णी यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे स्वप्नीलच्या काकाची भूमिका साकारत आहेत. याशिवाय ट्रेलरमध्ये सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, आणि इतर आघाडीचे कलाकारदेखील दिसत आहे. तसेच सई देवधर हिचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. ‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या वाक्याला तंतोतंत जुळेल असा हा ‘मोगरा फुलला’ चित्रपटाचा ट्रेलर असून यावरून अस वाटतंय की, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम समरणात राहील यात काही शंका नाही.

या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, यांशिवाय सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे,दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नाळीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

“वेगळा लुक, उत्तम कलाकार, दर्जेदार संगीत आणि त्याजोडीला कसदार कथा व साजेसे दिग्दर्शन या गोष्टींमुळे मोगरा फुलला अगदी जुळून आला आहे. हा चित्रपट चित्रित करताना एक वेगळे समाधान मला मिळाले आणि तो पाहताना ते प्रेक्षकांनाही मिळेल, याबद्दल शंका नाही,” असे उद्गार स्वप्नील जोशीने काढले.

नीना कुळकर्णी सांगतात, “मी सेटवर काम करत असताना खुश होते कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नील जोशीबरोबर पुन्हा १४ वर्षांनी काम करायला मिळालं, त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव फारच छान होता. अभिनेता म्हणून तो हुशार आहे पण माणूस म्हणून देखील खूप छान आहे मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते मला त्याचा स्वभाव फार आवडतो. चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे ह्यांच्या बरोबर पुन्हा काम करायला मजा आली. 'मोगरा फुलाला' ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं. या चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांचादेखील विशेष उल्लेख करेन. त्यांचे विशेष आभार."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT