Big Boss16 Abdu Rozik eskal
मनोरंजन

Big Boss16: ‘यू स्टूपिड डॉग’, अब्दूचा संताप झाला अनावर...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये दररोजच जोरदार भांडण होत असतात. हे काही वेगळ नाही. मात्र या भांडणातुन स्पर्धकांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येत आहे. अर्चना, शालिन यांच्या भांडणाने तर बिग बॉसच्या घराचे धाबेच दणाणले. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांची भांडण झाल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं होतं. खाण्यापासून ते झोपेपर्यंत कोणत्याही गोष्टीवरून स्पर्धकांमध्ये भांडण होऊ शकते. या शोमध्ये स्पर्धकांना राग येणं काही नवीन नाही.

 मात्र यावेळी जरा वेगळ चित्र बिग बॉसच्या घरात पहायला मिळालंय. यावेळी बिग बॉस 16 मधील  सर्वात लोकप्रिय आणि क्यूट स्पर्धक अब्दू रोजिकला राग आलाय. तो जास्तच संतापलेला दिसत आहे. नुकतचं त्याला बिग बॉसचा कॅप्टन बनवलेला आहे. त्यामुळे त्याला घरच्यांवर लक्ष ठेवाचय. पण ते करण्यासाठी त्याला स्पर्धकांवर रागवावंही लागत आहे.

'बिग बॉस 16' चा नवा कॅप्टन अब्दू रोजिकच्या आदेशाचं पालन करण्यास अर्चनाने नकार दिला अन् घरात जोरदार वाद झाला. याचा एक प्रोमो निर्मात्यानी चाहत्यांन सोबत शेअर केलाय. यात अब्दू अर्चनावर जोरदार संतापलेला दिसतोय. याचं कारण म्हणजे ती सकाळी झोपलेली आहे. अब्दू तिला बेडवरुन उठायला सांगतो, पण ती काय त्याचं ऐकत नाही.

हेही वाचा: का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

त्यावर अब्दुबाहेर येत यावर बोलतो. तेव्हा शिव ठाकरे तिच्या रुममध्ये जातो आणि म्हणतो “तुला अब्दुच्या आदेशाचे पालन करावंच लागेल. तो घराचा कॅप्टन आहे." त्यावर ती म्हणते, "तो नेहमीच भुंकत असतो." हे ऐकल्यावर तो जास्तच भनकतो आणि तिला म्हणतो, "मी नाही, तू स्टुपिड डॉग  आहेस." त्यानंतर तो सर्वांना सांगतो की ही झोपण्याची वेळ नाही आणि तो अर्चनाला फक्त सकाळी झोपू नकोस असं सांगतो, पण ती काय त्याचं ऐकायला तयार नाही.

याआधीही त्याचा अर्चनासोबत वाद झालाय त्यावेळी ती निम्रितबद्दल खोटं बोलली होती की ती झोपली होती, पण नंतर अब्दूला कळले की निमृत काम करत आहे. अब्दुशीला हे आवडत नाही. तो शांत होतो आणि त्यांनतर तिला तुरुंगात टाकण्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतो.

त्याचा  हा रागीट लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत, कारण आतापर्यंत तो त्याच्या दिलखुलास आणि मनमिळावू स्वभाव सर्वांनीच पाहिला. त्याचा अँग्री यंग मॅन लूक प्रेक्षकांना दिसलाय. अब्दूचा संतापाची आता सोशल मीडियावरही चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत अब्दू शांत राहण्याचे नाटक करत होता, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर, हाच त्याचा खरा चेहरा असल्याचंही नेटकरी म्हणत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchang 13 April 2026 : सोमवार पंचांग! आजचा दिवस शुभ की अशुभ? जाणून घ्या वरुथिनी एकादशी, मुहूर्त

Best Low-Calorie Breakfast: डायट फॉलो करताय? मग नाश्त्यात हा लो-कॅलरी आणि हाय-न्यूट्रिशन स्मूदी बाउल नक्की ट्राय करा

आजचे राशिभविष्य - १३ एप्रिल २०२६

मोठी बातमी! संचमान्येत मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक भरले, पगार थांबविला; अनेक शिक्षक आमदारांचे ‘पीए’, नियुक्ती शाळेत अन्‌ काम दुसरीकडे, वाचा...

अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी यावर्षी दोनदा ‘सीईटी’! आता २६ एप्रिलपर्यंत ऑनलाईन परीक्षा; मे महिन्यात विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, वाचा...

SCROLL FOR NEXT