Tv Entertainment News Panchayat fame Jitendra Kumar
Tv Entertainment News Panchayat fame Jitendra Kumar  esakal
मनोरंजन

Panchayat 2: IIT सोडून पंचायत फेम जितेंद्र अभिनय क्षेत्रात आला, कोट्याधीश झाला

युगंधर ताजणे

Panchayat fame Jitendra Kumar Net Worth: आपण तर आयआयटी इंजिनियर आहोत पण आपल्याला अभिनयाची आवड आहे. काही करायचे झाल्यास याच क्षेत्रात काही भरीव कामगिरी करायची असा पण जितेंद्र कुमारचा विचार होता. (Tv entertainment News) गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन त्याच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांना तो कोटा फॅक्टरी मधला जितु भैय्या म्हणून माहिती झाला आहे तर अनेकांनी त्याची ओळख पंचायतमधील अभिषेक म्हणून आहे. (Bollywood movie) त्यानं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. सध्या त्याच्या पंचायत या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. त्यामधुन पुन्हा (web serise) एकदा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. यासगळ्यात जितेंद्रच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत आहे.

Jitendra Kumar Actor

स्वताला सिद्ध करण्यासाठी जितेंद्र फार मेहनत घेतली आहे. त्यानं आयआयआटी सारख्या संस्थेतून इंजिनियरींग पूर्ण केलं असताना त्याला अभिनयाची गोडी होती. दिसायला अगदी जेमतेम असणारा जितेंद्र सध्या देशातल्या तरुणाईचा आवडता कलाकार आहे. तो कोटा फॅक्टरी पासून चर्चेत आला. तिथुन पुढे त्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.

web serise panchayat 2 actor jitendra kumar

जितेंद्र हा राजस्थानातील अलवरमधील खैरथल येथे राहणारा आहे. त्यानं आयआयटी खरगपूर येथून सिव्हिल इंजिनियरींग पूर्ण केली आहे. आपल्याला इंजिनियरींग नाहीतर अॅक्टिंग करायची असा त्याचा होरा होता. त्यानं तो पूर्ण करुन दाखवला. कोटा फॅक्टरीमध्ये त्यानं प्राध्यापकाची केलेली भूमिका चाहत्यांना आवडून गेली. त्यामुळे तो भविष्यातील एक उत्तम अभिनेता आहे. अशी त्यांची खात्री पटली.

News Panchayat fame Jitendra Kumar Net Worth

जितेंद्रनं वेब सीरिजमध्ये येण्यापूर्वी अनेक जाहिरांतीमधून स्वतला सिद्ध केले होते. सध्या जितेंद्र कुमार हा मालिकेच्या एका भागासाठी 50 हजार घेतो. तर पूर्ण सीरिजसाठी 10 लाखांपेक्षा अधिक त्याचे मानधन असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तो शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या एकुण संपत्तीचा आकडा हा 7 कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT