upcoming marathi movie maza agadbam
upcoming marathi movie maza agadbam 
मनोरंजन

अगडबम सिनेमा 'माझा अगडबम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळवृत्तसेवा

सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेल्या 'माझा अगडबम' हा सिनेमा दिवसागणिक चर्चेचा विषय ठरत आहे. येत्या २६ ऑक्टोबर ला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे.

लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लॉन्च करण्यात आले. या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अशा या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 

'माझा अगडबम' या सिनेमाचा हा पोस्टर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्सअंतर्गत या सिनेमाची प्रस्तुती होत असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

तसेच या सिनेमाच्या सहनिर्मात्यांच्या फळीत रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांचा समावेश आहे. बल्लू सलुजा यांनी या सिनेमाचे संकलन केले असून, मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर या मराठीतील आघाडीच्या गीतकारांच्या गाण्यांना टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. असा हा दर्जेदार कलाकृतीने नटलेला ‘माझा अगडबम’ सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खुमासदार मेजवानी ठरेल, यात शंका नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT