vaibhav mangle: अभिनेते वैभव मांगले सध्या बरेच चर्चेत आहेत. कारण त्यांची नवी 'चंद्रविलास' ही मालिका येऊ घातली आहे. या मालिकेत वैभव चक्क 200 वर्ष जुन्या आत्म्याची म्हणजेच भुताची भूमिका साकारणार आहे.
या मालिकेतील वैभवच्या भयकारी रूपाचीही बरीच चर्चा झाली. पण भुताची भूमिका साकारणारा वैभव खऱ्या आयुष्यात मात्र भूतांना चांगलाच घाबरून असतो. तुम्हाला हे खोटं वाटेल पण याबाबत वैभवने स्वतःच खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्याने ही बाब सांगितली.
(vaibhav mangale play horror role in chandravilas serial but he revealed fears to watch horror films)
वैभवने आजवर मराठी अनेक भूमिका केल्या. त्याचा टाइमपास चित्रपट असो की मालिकांमधील विनोदी काम.. त्याने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली. अगदी 'अलबत्या गलबत्या' नाटकातूनही त्याने चेटकीण बनून छोट्या दोस्तांना वेड लावले. आता मात्र तो खऱ्या भुताच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना घाबरवणार आहे.
लवकरच तो ‘झी मराठी’वरील ‘चंद्रविलास’ या मालिकेमध्ये एका वेगळ्याच अवतारात दिसेल. पण लोकांना घाबरवण्यासाठी भुताची भूमिका करणाऱ्या वैभवला मात्र खऱ्या आयुष्यात भुतांची प्रचंड भीती वाटते.
एका मुलाखतीत वैभव म्हणाला, 'या मालिकेत मी नरहरपंत नावाच्या दोनशे वर्षांच्या आत्म्याची भूमिका साकारत आहे. तो चंद्रविलासमध्ये का आहे? तो तिथे लोकांना का बोलावतो? हे तुम्हाला पहिल्या भागापासून दिसेल. तर याच बरोबर त्याच्या जोडीला आणखीन एक भूतही आहे, त्याबद्दल प्रेक्षकांना हळूहळू समजेल.'
पुढे तो म्हणाला, 'खऱ्या आयुष्यात मला भयपट आवडत नाहीत, कारण मला त्याची खूप भीती वाटते. त्यातील संगीताने मला खूप घाबरायला आणि दचकायला होतं. त्यामुळे मी लहानपणी तर भयपट पाहिलेच नाहीत. पण अलीकडच्या काळातही भुताचा चित्रपट पाहिला नाही. भीती नैसर्गिक भावना आहे आणि माणूस जर घाबरला नसता तर तो जिवंतच राहू शकला नसता.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.