Valentine Day 2024
Valentine Day 2024 Sakal
मनोरंजन

Valentine Day 2024: घरी बसून साजरा करणार ‘व्हॅलेंटाईन डे’? पार्टनरसोबत पाहा ओटीटीवरील 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

priyanka kulkarni

Valentine Day 2024: आजचा दिवस अनेकांसाठी खास आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day 2024) हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला गुलाब किंवा रिंग देऊन प्रपोज करतात, तर कोणी पत्नी किंवा नवऱ्यासाठी कॅन्डल लाईट डिनरचा बेत करतं. जर तुम्हाला हा खास दिवस तुमच्या पार्टनरसोबत घरी बसून साजरा करायचा असेल तर तुम्ही ओटीटीवर काही रोमँटिक चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.

Little Things (लिटिल थिंग्स)

'लिटिल थिंग्स' ही एक रोमँटिक -कॉमेडी वेब सीरिज आहे, ज्यामध्ये एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. सीरिजमध्ये ध्रुव सहगल आणि मिथिला पालकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.या सीरिजमधील दोघांचे प्रेमळ बाँडिंग प्रेक्षकांना खूप आवडले. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

Permanent Roommates (परमानेंट रूममेट्स)

परमानेंट रूममेट्स या वेब सीरिजमध्ये सुमित व्यास आणि निधी सिंह यांनी काम केलं आहे. या वेब सीरिजमध्ये एकत्र राहणाऱ्या कपलची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही वेब सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

Mismatched (मिसमॅच)

मिसमॅच या शोमध्ये तुम्हाला कॉलेजमधील एका जोडप्याची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हा शो 2020 मध्ये रिलीज झाला होता. प्राजक्ता कोहली आणि रोहित सराफ यांनी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दोन वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेल्या जोडप्याची भन्नाट प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनेत ट्विस्ट येतात ज्यामुळे तुम्ही खळखळून हसाल आणि चित्रपटातील काही सीन्स पाहून तुम्ही भावूकही व्हाल. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

जब वी मेट (Jab We Met)

जब वी मेट हा चित्रपट अनेकांचा ऑलटाइम फेवरेट रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटातील गीत आणि आदित्यच्या प्रेमकथेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT