Wedding Cha Shinema Marathi Film Trailer Released
Wedding Cha Shinema Marathi Film Trailer Released  
मनोरंजन

प्रीवेडिंग चित्रीकरण ते लग्नाच्या चालीरीतींवरील चर्चा; असा असेल ‘वेडिंगचा शिनेमा’

सकाळवृत्तसेवा

कवी डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरात चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच काल (ता. 26) प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाला. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची खमंग फोडणी असा हा एकूण मामला असेल, हे ट्रेलर पाहल्यानंतर कळेल. 

पारंपरिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाप आणि त्यातून कौटुंबिक मनोरंजन देणारा ‘वेडिंगचा शिनेमा’ 12 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्रीवेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमघर, योगिनी पोफळे हे आघाडीचे कलाकार या चित्रपटात आहेत. शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी या चित्रपटातून प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’मधील डॉ. सलील कुलकर्णी यांचे सहकारी आणि कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’चीच कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.



Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT