Bigg Boss Marathi 3 Grand Finale  file
मनोरंजन

Big Boss Marathi Season 3: असा पार पडला ग्रँड फिनाले

जाणून घ्या, प्रत्येक अपडेट

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi 3 Grand Finale Highlights : बिग बॉस मराठी ३चा विजेता विशाल निकम ठरला आहे. अंतिम फेरीत जय दुधाणे आणि विशाल यांच्यामध्ये चुरस रंगली होती. या पर्वाचा विशाल निकम हा विजेता ठरला. तर उपविजेताचा मान जय दुधाणे याने पटकावला. विजेत्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचा धनादेश मिळाला.

विकास पाटीलचा 'बिग बॉस मराठी ३'मधील प्रवास संपुष्टात.. विशाल निकम आणि जय दुधाणेमध्ये अंतिम चुरस

सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी कर्करोगाला दिलेल्या लढ्याबाबत उत्कर्षने लिहिलं भावनिक पत्र. बिग बॉसच्या स्पर्धकांचं प्रेम पाहून मांजरेकरही झाले भावूक

Mahesh Manjrekar, Host Of Bigg Boss Marathi 3

'अप्सरा आली..' या गाण्यावर मीरा जगन्नाथचा जबरदस्त परफॉर्मन्स

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये दादूसचं दमदार परफॉर्मन्स

बिग बॉस मराठीच्या घरातून उत्कर्ष शिंदे बाहेर पडला. विशाल निकम, विकास पाटील आणि जय दुधाणे या तिघांमध्ये चुरस. (who will win bigg boss marathi season 3)

स्नेहा वाघने टॉप ४ स्पर्धकांविषयी मांडलं मत, म्हणाली, "विशाल निकम हा सच्चा माणूस आहे, विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे हे मास्टरमाईंड आहेत. तर जय दुधाणे हा गेम चेंजर आहे."

बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघचा जबरदस्त परफॉर्मन्स, आपल्या दिलखेचक अदांनी स्नेहा करतेय सर्वांना घायाळ

  • प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं, मला आशा होती की मी जिंकेन. आउट झाल्यावर मीनल शाहला अश्रू झाले अनावर

  • टॉप पाच स्पर्धकांतून मिनलचा पत्ता झाला कट

-विशाल सेफ

-जय - सेफ

-उत्कर्ष - सेफ

-मीनल - आऊट

-विकास - सेफ

(bigg boss marathi season 3 contestants list)

  • महेश मांजरेकरांनी घेतली स्पर्धकांची फिरकी, म्हणाले; या बँगेत आहेत पाच लाख रुपये.....

  • विशाल म्हणतो - मला ते पाच लाख नकोत, जे काही होईल ते मान्य. मी माझ्या बायकोला लक्ष्मी मानतो. या लक्ष्मीपेक्षा माझ्या घरच्या लक्ष्मीवर जास्त विश्वास जिंकण हेच अंतिम ध्येय

  • मीनल म्हणाली, ट्रॉफीशिवाय दुसर स्वप्न पाहिलेच नाही

  • उत्कर्ष - मला पैसे नकोत. सन्मानानं जायचं

  • सोनाली पाटीलनं बिग बॉसच्या मंचावर लावली आग....तिनं केलेला डान्स प्रेक्षकांच्या डोळ्याच पारणं फेडणारा असाच होता.

  • याशिवाय अक्षय वाघमारेनं दिला कडक परफॉर्मन्स....

  • स्वाती पाटील: विकासची पत्नी म्हणाली; विकास तू खूप छान खेळला आहेस. महाराष्ट्रानं तुला सपोर्ट केलं त्याचा आनंद आहे. यावेळी विकासची आई आणि बाबा यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या. कुटुंबियांकडून मिळालेल्या शुभेच्छानंतर विकासच्या डोळ्यात पाणी आले. तो चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

  • -बिग बॉसच्या घरात आता प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुलेचं आगमन

  • माझ्या भाचीनं मला जयला माझ्यावतीनं शुभेच्छा द्यायला सांगितलं आहे. मीनल तु खूप छान खेळली आहे. विशालनं देखील सर्वांची मनं जिंकली आहेत. या शब्दांत भार्गवीनं कौतूक केलं आहे.

  • सहभागी स्पर्धकांना घरच्यांकडून मिळाल्या शुभेच्छा...

  • मीनलच्या शानदार परफॉर्न्सनं प्रेक्षकांची जिंकली मनं...

  • काही झाली तरी ट्रॉफी घेऊन ये...मीनलच्या आजीनं दिल्या शुभेच्छा

  • बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याला झाली सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT