Yash raj films supports daily wage workers during lockdown
Yash raj films supports daily wage workers during lockdown 
मनोरंजन

यशराज बॅनर्सदेखील कामगारांना करणार आर्थिक मदत

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः कोरोनामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या चित्रपटसृष्टीतील कामगारांना आता यशराज बॅनर्सही दीड कोटी रुपयांची मदत करणार आहे. सध्या लाँकडाऊनमुळे त्या कामगारांशी थेट संपर्क साधता येत नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याचे यशराजने ठरविले आहे. त्याकरिता काही कामगारांची बँक अकाऊंट मागविण्यात आली आहेत. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आता मदतीसाठी पुढे येत आहेत. देशावर आलेल्या या मोठ्या संकटामुळे आता अनेकांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. कित्येकांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. चित्रपटसृष्टीत काम करणारे लाईटमन, स्पाॅटबाॅय, कारपेंटर्स, ज्युनियर आर्टिस्ट अशा अनेकांना कोरोनाचा फटका बसलेला आहे. त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. काही कलाकारांनी मुख्यमंत्री सहायता निधी तर काही कलाकारांनी पंतप्रधान फंडामध्ये मदत करण्याचे अगोदरच जाहीर केले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे बॅनर्स असलेल्या यशराजने दीड कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. चित्रपटसृष्टीतील गरजू कामगारांना ही मदत देण्यात येणार आहे. काही कामगारांची नावे त्यांनी मागितली आहेत आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. सध्या चित्रीकरण बंद असल्यामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या या कामगारांना मोठी आर्थिक चणचण भासत आहे. त्यांच्याकरिता ही मदत देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT