marathi serials 
मनोरंजन

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात 'या' मालिकेने मारली बाजी, 'अग्गंबाई सासूबाई'ला टाकलं मागे

स्वाती वेमूल

मराठी मनोरंजनविश्वात एकापेक्षा एक लोकप्रिय कार्यक्रम देऊन प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या झी मराठी वाहिनीचा पुरस्कार सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात येऊ कशी तशी मी नांदायला, माझा होशील ना आणि देवमाणूस या तीन मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. हा पुरस्कार सोहळा झी मराठी वाहिनीवर दोन टप्प्यांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहळ्याचा पूर्वार्ध रविवारी प्रक्षेपित झाला तर उत्तरार्ध ४ एप्रिल रोजी प्रक्षेपित होणार आहे. माझा होशील ना या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार पटकावला. तर याच मालिकेच्या शीर्षकगीताला सर्वोत्कृष्ट शीर्षकगीताचा सन्मान मिळाला. 

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पार पडलेल्या पुरस्कारांची यादी
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत- अशोक पत्की (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट आई- शकू (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट बाबा - दादा साळवी (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट सून- शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट सासू- आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट सासरे- ब्रह्मे मामा (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट खलनायिका- मालविका (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट खलनायक- डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुमन काकी (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशिकांत बिराजदार (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट भावंडं- ब्रह्मे मामा (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री- सरु आजी (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- टोण्या (देवमाणूस)

पूर्वार्धात पार पडलेल्या या १३ पुरस्कारांपैकी माझा होशील ना या मालिकेला चार, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला चार, देवमाणूस या मालिकेला तीन आणि अग्गंबाई सासूबाई या मालिकेला दोन पुरस्कार मिळाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Case : मुंबई पोलिसांच्या नावाने बंगळूरच्या वृद्धाची १.७७ कोटींची फसवणूक

Baramati News : बारामतीत साकारणार अत्याधुनिक क्रीडा संकुल; 79 कोटींच्या खर्चास मिळाली प्रशासकीय मान्यता...

Jasprit Bumrah ला १० पैकी ६ गुण: तो अपेक्षांवर खरा उतरला नाही! इरफान पठाणची टीका; म्हणाला, जगातला नंबर १ गोलंदाज अन्...

Crime News : हे कसलं प्रेम? पत्नीने पतीच्या कानात विष घालून केली हत्या, युट्यूबवरून शिकली कसा करायचा मर्डर, नेमकं प्रकरण काय?

'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं नवं घर; धुमधडाक्यात केला गृहप्रवेश, पाहा इंटेरिअरचे फोटो

SCROLL FOR NEXT