latur
latur 
मराठवाडा

डिसेंबरपर्यंत एक रेल्वे बोगी तयार व्हावी : निलंगेकर

हरी तुगावकर

लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते
शुक्रवारी (ता. 12) करण्यात आला. कारखाना उभारणीचे वेळापत्रक ठरवून काम व्हावे. 25 डिसेंबरपर्यंत या कारखान्यातून किमान एक बोगी तयार होऊन बाहेर पडावी, अशी अपेक्षा निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुनील गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक
अभिमन्यू पवार,रमेश कराड यांच्या हस्तेही पूजा करण्यात आली. यावेळी आमदार त्र्यंबक भिसे, आमदार विक्रम काळे, आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर सुरेश पवार, रेल्वे विकास निगम लि.चे ग्रुप मॅनेजर एस.एस मिश्रा, रेड्डी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेश मेघमाळे यांच्यासह जिल्हयातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या एखाद्या कामाच्या निविदा लवकर निघत नाहीत. त्या पेक्षा किती तरी गतीने या कामाच्या निविदा काढून आज कामाला सुरवात झाली आहे. आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे. रेल्वेच्या इतिहास पहिल्यांदाच अत्यंत कमी वेळात प्रकल्पाच्या कामाला सुरवात होत आहे. दर पंधरा दिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल हे घेणार आहेत.

तसेच येथे या प्रकल्पाच्या अनुषंगाने येणाऱया इतर इंडस्ट्रीजचा क्लस्टर झोन तयार करण्यासाठी गोयल ता. तीन नोव्हेंबर रोजी बैठक घेणार आहेत. हा प्रकल्प लातूरलाच व्हावा अशी रेल्वेतील काही अधिकारी व सरकारची देखील इच्छा होती. मराठवाड्यासाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे, असे निलंगेकर म्हणाले. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामाची रेल्वेच्या अधिकाऱयांकडून माहिती करुन घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT