parbhani
parbhani 
मराठवाडा

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 111 विद्यार्थ्यांचा बोनमँरो डोनेशनचा संकल्प

गणेश पांडे

परभणी : थॅलेसिमिया या अनुवांशिक गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या जिल्ह्यातील 104 रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 111 विद्यार्थांनी त्यांच्या बोन मॅरो डोनेशनसाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांची स्वंयस्फुर्तीने नोंदणी केली आहे.

थायलेसिमिया हा रक्ताचा अनुवंशिक गंभीर आजार असून बाळाच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत या आजाराचे निदान होते. मेजर या गंभीर आजारात रुग्णांचा शरीरात रक्त तयार होत नाही. त्यामुळे दर पंधरा दिवसाला बाहेरून रक्त द्यावे लागते. या सोबतच दरमहा शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित करण्याकरिता 5 ते सहा हजार रुपयांच्या औषधी लागतात.

परभणी जिल्ह्यात या आजाराची 104 बालके आहेत. या आजारावरील एकमेव उपचार आहे, तो म्हणजे 'बोनमॅरो ट्रान्सप्लांट'. याकरिता साधारणतः 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. गेल्या चार वर्षापासून परभणी थायलेसिमिया सपोर्ट ग्रुप मार्फत मिशन 2020 थायलेसिमिया फ्री सोसायटी हे अभियान राबविण्यात येत आहे. या रक्तगटाच्या गंभीर आजाराचा बालकाचा जन्म होऊ नये याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वधू वर सूचक मंडळात या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे. त्यांची थायलेसिमिया मायनर ही तपासणी मोफत केली जाते. यासोबतच ब्लड कॅन्सर व थायलेसिमिया रुग्णांना आवश्यक असलेला बोनमॅरो मिळावा याकरिता विद्यार्थ्यांमध्ये बोनमॅरो डोनेशन बाबतही जनजागृतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यात पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 111 विद्यार्थ्यांनी बोन मॅरो डोनेशन करिता उस्फुर्तपणे नोंदणी केली आहे. 

परभणी थायलेसिमिया सपोर्ट ग्रुप ने ता. 24 एप्रिल रोजी रुग्णांच्या सख्खा भाऊ - बहिणी सोबत बोन मेरो क्रॉस मॅचींग शिबिराचे आयोजन केले होते. त्यात महाराष्ट्रातील व इतर राज्यातील एकूण 190 रुग्णांच्या सख्या बहीण भावाचे बोनमॅरो करण्यात आले. याकरिता प्रत्येकी 40 हजार रुपये खर्च येतो. या सर्व तपासण्या परभणी थायलेसिमिया ग्रुपच्या माध्यमातून मोफत करण्यात आल्या. 

जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटरआज पर्यंत परभणी थायलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून तीन रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊन या आजारातून मुक्ती मिळाली आहे जिल्ह्यातील आज पर्यंत 40 रुग्णाचे बोन मेरो क्रॉस मॅचींग ही तपासणी मोफत करण्यात आली आहे. थॅलीसिमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून थायलेसिमिया व हिमोफिलिया डे केअर सेंटर चालू करण्यात येत आहे. 
- लक्ष्मीकांत पिंपळगावकर, थॅलिसिमिया सपोर्ट ग्रुप, परभणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT