116 missing case closed by police successfully most of girls settle with lover love story jalna
116 missing case closed by police successfully most of girls settle with lover love story jalna sakal
मराठवाडा

Missing Girl Case : शेकडो बेपत्ता मुलींचा लागला शोध; बहुतांश मुली प्रियकरासोबत फरार

उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यासह राज्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या बेपत्ता होणाऱ्या मुली नेमक्या जातात कुठे असा प्रश्‍न अनेकांसमोर आहे. मात्र, बेपत्ता होणाऱ्या बहुतांश मुली प्रियकरासोबत फरार झाल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याचे चित्र आहे.

मागील सोळा महिन्यात जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या तब्बल ११६ मुलींचा शोध घेण्यात आलेला आहे, याशिवाय बेपत्ता झालेल्या ४३ मुलांचा शोध लागला. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षासह पोलिस प्रशासनाने शोध लावला ही कामगिरी केलेली आहे. राज्यासह जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याची प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मुली बेपत्ता होत असल्याने त्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर होते.

मागील सोळा महिन्यात बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचे एकूण १८७ गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यात एकूण १९९ मुले-मुली बेपत्ता झाले होते. यात जिल्ह्यातून तब्बल १४६ मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. केवळ मुलीच नाहीत तर जिल्ह्यातून ५३ मुलेही बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस प्रशासनाकडे झाली होती.

बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचा पोलिस प्रशासनाकडून शोध घेत असताना बहुतांश प्रकरणात मुले-मुली प्रेम प्रकरणातून घरातून धूम ठोकल्याचे पुढे आले. मागील सोळा महिन्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षासह पोलिस प्रशासनाने बेपत्ता झालेल्या १४६ मुलींपैकी ११६ मुलींचा शोध लावला आहे.

तर ३० बेपत्ता मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. तर ५३ मुलांपैकी ४३ बेपत्ता मुलांचा शोध लागला असून १० मुलांचा शोध सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलीचे प्रमाण अधिक असले तरी त्यांना शोध लावण्यात ही पोलिसांना यश येत असल्याचे चित्र आहे.

बेपत्ता झालेल्या मुला-मुलींच्या शोधासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात पथकाची स्थापना केली आहे. शिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयातही एक विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या कामाचा दर महिन्याला आढावा घेतला जातो. त्यामुळे बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचा शोध कामात यश येत आहे. उर्वरित गुन्हे निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

— डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, जालना

२०२२ वर्षात बेपत्ता झालेल्या मुला-मुलींची संख्या

आकडेवारी :अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष

महिना - मुली मुले

जानेवारी - ११ - ०५

फेब्रुवारी - ०५ - ०३

मार्च - ०८ - ०४

एप्रिल - १३ - ०१

मे - ०८ - ०४

जून - ०२ - ०२

जुलै - ०७ - ०१

ऑगस्ट - ०५ - ०४

सप्टेंबर - १४ - ०९

ऑक्टोबर - १२ - ०२

नोव्हेंबर - ०८ - ०४

डिसेंबर - ०४ - ०४

एकूण - ९७ - ४३

२०२२ वर्षात सापडलेले बेपत्ता मुला-मुलींची संख्या

महिना - मुली - मुले

जानेवारी १० - ०५

फेब्रुवारी ०३ - ०३

मार्च - ०८ - ०३

एप्रिल - ११ - ०१

मे - ०६ - ०४

जून - ०१ - ०१

जुलै - ०७ - ०१

ऑगस्ट - ०३ - ०२

सप्टेंबर - १३ - ०६

ऑक्टोबर - १२ - ०२

नोव्हेंबर - ०५ - ०४

डिसेंबर - ०३ - ३

एकूण - ८२ - ३५

२०२३ वर्षात बेपत्ता झालेल्या मुला-मुलींची संख्या

महिना - मुली - मुले

जानेवारी - ०६ - ०५

फेब्रुवारी - ०८ - ०२

मार्च - १५ - ०२

एप्रिल - २० - ०१

एकूण - ४९ - १०

२०२३ वर्षात सापडलेले बेपत्ता मुला-मुलींची संख्या

महिना - मुली - मुले

जानेवारी - ०४ - ०५

फेब्रुवारी - ०५ - ०१

मार्च - १० - ०२

एप्रिल - १५ -००

एकूण - ३४ - ०८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT