Soygaon News
Soygaon News  Sakal
मराठवाडा

Soygaon News : सोयगाव तालुक्याला १२ नवीन शिक्षक; तेरा शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतून सोयगाव तालुक्याला १२ नवीन शिक्षक मिळाले असून तेरा शिक्षकांची सोयगाव तालुक्यातून जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. त्यामुळे सोयगावात शिक्षकाची पुन्हा स्थिती जैसे थे झाली असून समायोजनमधून दहा अतिरिक्त शिक्षकांची इतर शाळेत बदली केल्ल्याचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांनी सांगितले.

सोयगावसह फर्दापूर, ठाणा या तीन उर्दू माध्यमांच्या शाळांना अखेर नवीन पाच शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे ऊर्दूच्या विद्यार्थ्यांची पाच वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.शुक्रवारी सोयगावच्या प्राथमिक ऊर्दू शाळेत दोन शिक्षक रुजूदेखील झाले आहेत. सोयगाव तालुक्यात ऊर्दूच्या तीन प्राथमिक शाळांना पाच शिक्षक मिळाले आहेत. सोयगाव-२, फर्दापूर-१ आणि ठाणा-२ असे ऊर्दूचे, तर गणित व विज्ञान या विषयासाठी एक, भाषा विषयासाठी प्राथमिक शाळांना प्रत्येकी एक असे पाच शिक्षक मिळाले आहे.

भाषा विषयासाठी बोरमाळ तांडा-१, निंबायती-१, नांदा तांडा-१, पळाशी-१,जमाठी-१ व लेनापूर प्राथमिक शाळेला एक असे एकूण १२ शिक्षक सोयगाव तालुक्यात नवीन आले. मात्र तेरा शिक्षकांची सोयगाव तालुक्यातून जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. सोयगाव तालुक्यात नवीन बारा शिक्षक मिळाले. मात्र दुसरीकडे जिल्ह्याबाहेर बदलीतून तेरा शिक्षक बदली करून गेले. त्यामुळे सोयगाव तालुक्यात आगामी वर्षातही शिक्षकांची कमतरता भासणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सह शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शनिवारी (दि.१६) होणाऱ्या बदलीतून सोयगावला अजून शिक्षक मिळणार आहेत. त्यामुळे सोयगावला शिक्षक संख्या समाधानकारक राहील.

- रंगनाथ आढाव, गटशिक्षणाधिकारी, सोयगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT