मराठवाडा

राज्यातून बारा हजार भाविक जाणार हजला

शेखलाल शेख

मराठवाड्यातील दोन हजार 953 जणांचा समावेश
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत या वर्षी राज्यातून 11 हजार 907 भाविक हजला जाणार असून, यामध्ये थेट नंबर लागलेल्या 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 2,254 भाविकांचा समावेश आहे. उर्वरित नऊ हजार 622 भाविकांचा सोडतीच्या माध्यमातून नंबर लागला आहे.
भाविकांना या वर्षी हजला जाताना छातीचा एक्‍स-रे आणि रक्ततपासणीचा सीबीसी रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय विमान प्रवास खर्चामधील जीएसटी 18 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांवर आणल्याने भाविकांना सात ते दहा हजार रुपयांपर्यंत कमी खर्च येईल.

या वर्षी राज्यभरातून 35 हजार 666 भाविकांनी अर्ज केले होते. यामध्ये 17 हजार 742 महिला, तर 17 हजार 960 पुरुषांचा समावेश आहे. त्यात मराठवाड्यातून दोन हजार 953 भाविकांचा हजसाठी नंबर लागला आहे. यामध्ये सर्वाधिक 891 भाविक औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत; तर सर्वांत कमी 139 भाविक हिंगोली जिल्ह्यातील आहेत.

मराठवाड्यातील भाविकांना हजला जाण्यासाठी औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावरून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपासून भाविकांना मुंबई किंवा औरंगाबाद विमानतळापैकी एकाची निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. औरंगाबाद विमानतळासाठी या वर्षी आतापर्यंत 821 भाविकांनी पसंती दिली आहे. जुलै महिन्यात मराठवाड्यातील भाविक हजला जातील, अशी शक्‍यता आहे.

सात ते दहा हजारांची बचत
हजला जाण्यासाठी विमान खर्चावरील जीएसटी पाच टक्‍के केल्याने भाविकांच्या सात ते दहा हजारांची बचत होईल. नंबर लागलेल्या भाविकांना 81 हजार रुपयांचा पहिला हप्ता ता. पाच फेब्रुवारीपर्यंत, तर एक लाख 20 हजारांचा दुसरा हप्ता 20 मार्चपर्यंत हज समितीच्या खात्यात जमा करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT