file photo
file photo 
मराठवाडा

३१ फिव्हर क्लिनिकला मिळाल्या ‘इन्फ्रारेड गन’

कैलास चव्हाण

परभणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकारातून ३१ फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले.  किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करून तपासणी व उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ इन्फ्रारेड गनचा पुरवठा करण्यात आला आहे. या गनच्या सहाय्याने काही अंतरावरून तापाची नोंद केली जात आहे. 
कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने सर्तकता बाळगत आरोग्य विभागाकडून जागोजागी नागरिकांची स्क्रीनिंग केली जात आहे. मागील काही दिवसांमध्ये परजिल्ह्यांतून मोठ्या संख्येने लोक जिल्ह्यात परत आले आहेत. त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले जात आहेत. बाहेरून आलेले आणि जिल्ह्यात असलेल्या रुग्णांची एकत्र तपासणी होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. संर्सगजन्य आजाराची लक्षणे असणाऱ्यांची तपासणी या कक्षात केली जात आहे.
जिल्ह्याला ४० इन्फ्रारेड (टेम्प्रेचर) गन मिळाल्या असून ३१ गन प्राथमिक आरोग्य केंद्रांना, तर उर्वरित नऊ गन या ग्रामीण रुग्णालयास देण्यात आल्या आहेत. या गनच्या सहाय्याने काही अंतरावरून तापाची नोंद केली जात आहे. ४० डिग्रीपेक्षा अधिक ताप असलेल्या नागरिकांना उपचार देणे सोयीचे होणार आहे. त्याच प्रमाणे १०० डिग्रीपर्यंत ताप नोंद झाला तर त्यास हायरिस्क असे समजले जाते.


हेही वाचा - आनंदाची बातमी: परभणी कोरोनामुक्त

ग्रामपंचायती करणार साहित्य खरेदी
 प्राथमिक आरोग्य केंद्र असणाऱ्या गावातील ३१ ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्यविषयक साहित्य खरेदी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या आहेत. तसे पत्र त्यांनी गटविकास अधिकारी व सरपंचांना दिले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिसरातील ग्रामस्थांच्या आजारावर निदान व उपचार केले जाते. त्यासाठी मल्टीपॅश मॉनिटर, तीन सीएच ईसीजी मशीन, बीपी ॲपरेट्स, स्टेथोस्कोप, अम्बू बॅग, सक्षण मशीन, फाऊलर बेड आदी साहित्याची आवश्यकता भासते. हे साहित्य १४ व्या वित्त आयोगातून खरेदी करून आरोग्य केंद्रांना पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. दैठणा (ता. परभणी) या ग्रामपंचायतीने यासाठी प्रथम पुढाकार घेतल्याचा या पत्रात उल्लेख केला आहे. दैठणा ग्रामपंचातीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास आवश्यक साहित्य पुरवठा केला आहे.

जिल्हा परिषद प्रयत्नशिल
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोरोनाच्या उपचारासाठी जास्तीत जास्त सुविधा देऊन मनुष्यबळास प्रशिक्षण देऊन बळकटीकरण करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात इन्फ्रारेड गनचा पुरवठा केला आहे.
- अजय चौधरी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Marathi News Live Update: पुण्यात वाऱ्यासह हलक्या पावसाला सुरूवात

Space Tourist :  भारतीय वंशाचे गोपीचंद रचणार इतिहास, सायंकाळी सात वाजता आकाशात झेपावणार अंतराळयान

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का! अर्शदीपने उडवला ट्रेविस हेडचा त्रिफळा

SCROLL FOR NEXT