Rising Stars Asia Cup Final: पाकड्यांचा माज पुन्हा उतरवला! सलग दुसरी फायनल १ विकेटने गमावली; श्रीलंकेने वाट लावली, शेजारी रडले Video

Sri Lanka A beat Pakistan in Rising Stars Asia Cup final : पाकिस्तानला नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा फायनलमध्ये एका विकेटने पराभवाचा धक्का बसला. श्रीलंका अ संघाने राइझिंग स्टार्स आशिया कपचे विजेतेपद आठ वर्षांनंतर पटकावले.
Sri Lanka A beat Pakistan in Rising Stars Asia Cup final

Sri Lanka A beat Pakistan in Rising Stars Asia Cup final

esakal

Updated on: 

Pakistan lose Rising Stars Asia Cup final by one wicket: पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघापाठोपाठ पाकिस्तान अ संघाला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात १ विकेट्सने हार पत्करावी लागली. काही दिवसांपूर्वी १९ वर्षांखालील पाकिस्तान संघाला आशिया चषक ( १९ वर्षांखालील) फायनलमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून थरारक हार पत्करावी लागली होती. त्याची पुनरावृत्ती आशिया चषक रायझिंग स्टार्स फायनलमध्ये पाहायला मिळाली, परंतु यावेळी त्यांना हरवणारा संघा श्रीलंका अ होता. श्रीलंकेच्या शेवटच्या विकेटने पाकिस्तानचा सर्व माज उतरवला आणि १ विकेट्स राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. श्रीलंकेने ८ वर्षानंतर या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.

Loading content, please wait...