आष्टी - तालुक्‍यातील पोखरी गावाजवळील अपघातानंतर कारची झालेली अवस्था.
आष्टी - तालुक्‍यातील पोखरी गावाजवळील अपघातानंतर कारची झालेली अवस्था. 
मराठवाडा

एकाच कुटुंबातील चौघे मृत्युमुखी

सकाळवृत्तसेवा

आष्टी (बीड) - भरधाव ट्रकने कारला समोरून जोराची धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. नगर-बीड महामार्गावर पोखरी गावाजवळील पोल फॅक्‍टरीसमोर रविवारी (ता. 17) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये एक महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे.

सावरगाव (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील रहिवासी असलेले चमकुरे कुटुंब उमरगाव (ता. उमरगाव, जि. बलसाड, गुजरात) येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (ता. 16) मुलगी पाहण्यासाठी या कुटुंबातील नागेश गोविंद चमकुरे (40), योगेश खुशाल चमकुरे (28), अनुजा शंकर चमकुरे (34), अनिकेत शंकर चमकुरे (8), खुशाल महादेव चमकुरे (58), सुशीला खुशाल चमकुरे (52), शंकर खुशाल चमकुरे (37), आरोही शंकर चमकुरे (10) हे सर्व जण इर्टिका कारने मुखेडकडे आले होते.

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री ते उमरगावकडे निघाले असताना समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे, अनिकेत चमकुरे हे जागीच ठार झाले. तर, इतर चौघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील लोकांनी जखमी व मृतांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT