‘श्रीं’ची मुर्ती
‘श्रीं’ची मुर्ती  
मराठवाडा

‘या’ जिल्ह्यातील खंडोबा यात्रेला ६६ वर्षांची परंपरा

कैलास चव्हाण

परभणी : परभणी शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री खंडोबा मंदिराच्या यात्रेला यंदा ६६ वर्ष पूर्ण होत आहेत. चंपाषष्ठीनिमित्त सोमवारी (ता.दोन) यात्रा भरली आहे. यानिमित्त स्थानीक प्रशासनाने शासकीय सुट्टी देखील जाहीर केलेली आहे.

शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या खंडोबा मंदिराच्या यात्रेला मोठी परंपरा आहे. सन १९५३ पासून येथे यात्रा भरत आलेली आहे. सध्या मंदिर आहे त्याच ठिकाणी पूर्वी एक लिंबाचे झाड होते. झाड वाळल्यानंतर १९५३ मध्ये श्री  खंडोबाची मुर्ती जमिनीवर दिसून आली. त्यामुळे परिसरातील भाविकांनी तेव्हा छोट्याशा मंदिरात मुर्तीचा स्थापना केली. तेव्हांपासून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द झाले. मागील १५ वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्नोध्दार करण्यात आला. मंदिराला गाभारा आणि सभामंडप बांधण्यात आले. त्यामुळे लहान मंदिरातून मुर्ती गाभाऱ्यात बसवण्यात आली.


१९५३ पासून या मंदिर परिसरात  चंपाषष्ठी निमित्त यात्रेची पंरपरा आहे. पूर्वी ही यात्रा १५ दिवसांची असायची, परंतु काळाच्या ओघात ज्या प्रमाणे अन्य ठिकाणच्या यात्रांना घरघर लागली तशीच घरघर येथील यात्रेला देखील लागली. तरीही एक दिवसाची का होईना परंतु परंपरा कायम ठेवत यात्रा भरते. दरवर्षी चंपाषष्ठीच्या आधी येणाऱ्या आमावस्येपासून घट बसविण्याची परंपरा आहे. चंपाषष्ठीली यात्र भरते. त्यानंतर दोन दिवस उत्सव असतो. या दरम्यान, चंपाषष्ठीला पहाटे चार ते आठपर्यंत अभिषेक, ८.३० वाजता वारु उधळणे, त्यानंतर पालखी मिरवणुक, रात्री काठी मिरवणुक निघते. दरवर्षी चंपाषष्ठीला जिल्हा प्रशासनाकडून शासकीय सुट्टी असते. सुट्टीची परंपरा १९६० च्या दशकात सुरु झाल्याची माहीती आहे.

 ढगे कुंटूबीयाची तिसरी पिढी सेवेत
१९५३ मध्ये मंदिराची स्थापना झाल्यानंतर काही वर्षात शहरात यात्रेनिमित्त विविध स्पर्धा सुरु झाल्या. प्रबोधन कार्यक्रम घेतले जात होते. १९६० च्या दशकात वाघ्या मुरळीची स्पर्धा असायची. या स्पर्धेत मुळचे कौसडी येथील बन्सी यादुजी ढगे हे प्रथम आले होते. त्यामुळे माजी खासदार कै. शेषरावभाऊ देशमुख यांनी बन्सी ढगे यांच्याकडे मंदिराचे सुत्रे सोपवल्याची माहीती ढगे यांच्या तिसऱ्या पिढीतील पुजारी रवि ढगे यांनी दिली.

 सुविधा देण्याची गरज
सध्या मंदिर चांगल्या अवस्थेत असले तरी अनेक सुविधांपासून वंचीत आहे. परभणीसह बाहेर जिल्ह्यातून दर रविवारी आणि यात्रा काळात भाविक मोठ्यासंख्येने मंदिरात येतात.त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी याच भागात भक्तनिवास, प्रसाधनगृह, पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.


 

महापालिका घेते स्पर्धा
दरवर्षी खंडोबा यात्रेनिमित्त महापालिकेच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. खो-खो, कब्बडी, लंगडी, लांब उड्या, दोरीवरच्या उड्या अशा पारंपारीक खेळासह क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येतात.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT