Aadhar-Card-Ration
Aadhar-Card-Ration 
मराठवाडा

आधार नसलेल्यांची रेशन कपात

विकास गाढवे

लातूर - ई-पॉस मशीनऐवजी पूर्वीच्या पद्धतीने धान्य घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना (रेशनकार्डधारक) आता धान्य मिळणार नाही. पुरवठा विभागाच्या प्रणालीत आधार क्रमांकाची नोंद न केलेल्या अशा रेशनकार्डधारकांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात येणाऱ्या धान्यात चालू महिन्यापासून निम्मी कपात करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. निम्म्या धान्याचे वाटपही कार्डधारकांची खात्री करून व गरज पाहूनच वाटप करण्याचे आदेश असल्याने अशा रेशनकार्डधारकांच्या नावावर होणारा स्वस्त धान्याचा बेनामी बाजार थांबणार आहे.

यामुळे जिल्ह्यातील सहा हजार सात रेशनकार्डधारक व कार्डधारकांच्या कुटुंबांतील साडेतीन लाख सदस्यांना धान्य मिळणार नाही. त्यांच्या नावावर दरमहा येत असलेल्या आठ हजार क्विंटल धान्याची कपात होणार आहे. पुरवठा विभागाच्या ई-पीडीएस या प्रणालीत आधार क्रमांकाची नोंद केलेल्या रेशनकार्डधारक व लाभार्थींना ई-पॉस मशीनवरून धान्याचे वाटप करण्यात येत आहे. आधार नोंद नसलेल्यांना पूर्वीच्या पद्धतीने धान्याचे वाटप सुरू होते. ही पद्धत पूर्ण बंद करून ई-पॉस मशीनवरूनच शंभर टक्के धान्याचे वाटप करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहे. सरकारच्या आदेशानुसार पूर्वीच्या पद्धतीनुसार वाटप होणाऱ्या धान्यात निम्मी कपात करून चालू महिन्यात रेशन दुकानदारांना धान्य वितरित केले जात असल्याचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी स्वप्नील पवार यांनी सांगितले.

आधार नोंदणीची स्थिती 
 एकूण रेशन कार्डधारक     ः     ३,६४,५८०
 लाभार्थी संख्या     ः     १९,३०,९३१
 आधार नोंदणी झालेले कार्डधारक     ः     ३,५८,५७३
 आधार नोंदणी न झालेले कार्डधारक     ः     ६००७
 आधार नोंदणी झालेले लाभार्थी     ः     १५,८३,१७६
 आधार नोंदणी न झालेले लाभार्थी     ः     ३,४७,७५५
 आधार नोंदणीकृत कार्डधारकाचे प्रमाण ः     ९८.३५ टक्के
 आधार नोंदणीकृत लाभार्थींचे प्रमाण     ः     ८१.९९ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT