file photo
file photo 
मराठवाडा

अबब.. परभणी जिल्ह्यातील १२७ गावात दुषीत पाणी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात ऑक्टोबर महिण्यात तपासलेल्या ९१५ पाणी नमुन्यापैकी १२७ गावातील १३५ नमुने दुषीत आढळले असून सर्वाधीक दुषीत पाणी जिंतुर तालुक्यात आढळले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने संबधीत पाणी वापरास बंदी घातली असून उपाययोजना केल्या जात आहेत.


दर महिण्याला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनीक पाणीपुरवठ्यांच्या स्त्रोतांची तपासणी जिल्हा सार्वजनीक आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात येते. ऑक्टोबर महिण्यात जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावात घेतलेल्या ५८३ नमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत तपासणी करण्यात आली. त्यातील ९५ नमुने दुषीत आढळले आहेत. तर लघु प्रयोग शाळेत ३३२ नमुने तपासले असता त्यातील ४० नमुने दुषीत आढळले आहेत. एकुण ९१५ नमुन्यापैकी १३५ नमुने दुषीत आढळले आहेत. एकुण १५ टक्के दुषीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.


दुषीत पाणी आढळलेले गावे अशीःमाळसोन्ना, धसाडडी, सहजपूर, जवळा, ताडपांगरी, आंबेटाकळी, दामपुरी, अमडापुर, डफवाडी, ब्रम्हपुरी, तरोडा पाटी, करडगाव, सनपुरी, नांददखेडा, साटला, पिंपळा, वाडीदमई, मांगणगाव, टाककळी कुंभकर्ण, डिग्रस, झरी, वझुर, बानेगाव, महागाव, गोळेगाव, भारती कॅम्प, एंरडेश्वर,आडगाव, रुपला, चुडावा, फुलकळस, एकरुखा, माखणी, ताडकळस, मौराळ सावंगी,जवळा, खळी, रामनगरततांडा, आनंदवाडी, सुप्पा, कुंडगिरवाडी, देवकतवाडी, चिलगरवाडी, अरबुजवाडी, कौडगाव, धरमनगरी, बेलवाडीतांडा, गोळेगाव, धामोणी, वाणीसंगम, दुधगाव, गंगा पिंपरी, वाडी, पिंपळगाव, पिराची तांडा, खोरस, कांदलगाव, बरबडी, वाडी खुर्द, खपाट पिंपरी, लाडनांद्रा, देउळगाव गगात, घो पिंपरी, वाघपिंपरी, सोनवटी, करडगाव, आंबेगाव, मालेटाकळी, टाकळी, शिराळा, सि.बोरगाव, गुळखंड, कुपटा, सिमनगाव, कान्हड, शेलवाडी, बोरगाव, वालूर, चिखलठाणा, मोरेगाव, ब्राम्हणगाव, गिरगगाव बु, अडसर, बोरकिनी, नरसापुर, देवगाव, सावळी, आंबबेगाव, राजुरा, कोथाळा, रामेटाकळी, सारंगपूर, वझुर खु, जंगमवाडी, खडकवाडी, लोहररा, इटाळी, बोर्डी, नागणगाव, लिंबाळा, डोहरा, रोहिला पिंपरी, आसेगाव, सोरजा, श्रीरामवाडी, डोंगरतळा, जुनुनवाडी, आघाववाडडी, निवळी, वडाळी, जांब बु, राजेगाव, गारखेडा, जांब खु, नांदगाव, दुधनगगाव, मारवाडी, कौसडी, गोंधळा, चांदज, रिडज, उमरज, दगडचोप, हांडी, केहाळ, केहाळ तांडा, विटा, लिंबा, बाभळगाव या गावांचा समावेश आहे.

फ्लोराईड नाही
गतवर्षी २०१८ मध्ये परभणी जिल्ह्यातील कान्हेगाव, मुंबर, देऊळगाव गात, धर्मापुरी, शहापुर, तुळजापूर, देऊळगाव दुधाटे, वालुर या गावातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण आढळले होते. त्यामुळे प्रशासनाने जेथे असे पाणी आढळले ते पाणी स्त्रोत कायमस्वरुपी बंद केल्याची माहीती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली आहे. यंदा ऑक्टोबर महिण्यात तपासणी केली असता फ्लोराईड आढळले नाही. नुकताच केंद्रशासाने जो अहवाल प्रसिध्द केला आहे त्यात परभणीचे नाव आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, याबाबत अधिक माहीती घेतली असता तो अहवाल गतवर्षीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
तालुकानिहाय दुषीत पाण्याचे नमुने
तालुका    तपासलेले नमुने   दुषीत नमुने
परभणी     २६                १२
पूर्णा        १३                 ९
गंगाखेड   १४                  २०
सोनपेठ    ६०               ६
पालम     २४               २
सेलू        ७१              २६
मानवत     ४९             ७
जिंतूर     १४९            ३१
पाथरी     ६८             ३
एकुण     ९१५              १३५
.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT