Aakefa-Mehrin
Aakefa-Mehrin 
मराठवाडा

आधी कार धडकली, नंतर चिरडले

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - बेफाम कारने दुचाकीला चिरडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मंगळवारी (ता.२४) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयाजवळ घडला. चिरडणारी कार एका पोलिसाची असल्याचा नातेवाइकांचा आरोप असून, अटकेनंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका त्यांनी घेतली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आकेफा मेहरीन मोहम्मद जहीर (वय १७, ह. मु. आरेफा कॉलनी, मूळ रा. नांदेड) असे मृताचे नाव आहे. 

ती नांदेड येथून शिक्षणासाठी औरंगाबादेत आली होती. ती बिडकीन येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. २२ एप्रिलला दुपारी अडीचच्या सुमारास ती शिकवणीसाठी दुचाकीने जात होती. आमखास मैदानाजवळील शासकीय कर्करोग रुग्णालयासमोर मागून आलेल्या करड्या रंगाची कार दुचाकीला धडकली. या अपघातात आकेफा रस्त्यावर कोसळली, कारचा वेग एवढा होता की, तिच्या अंगावरून कारचे चाक गेले. अपघातानंतर कारचालक न थांबता टाऊनहॉल मार्गे बेगमपुऱ्याकडे पसार झाला. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गंभीर जखमी आकेफाला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

तो पोलिस कर्मचारी होता?
घटनेदरम्यान तेथे उपस्थित नागरिक सांगतात, की कारचालक हा पोलिस कर्मचारी होता. या माहितीनंतर नातेवाइकांनी चालकास अटक करावी, नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका घेतली. यानंतर सिटी चौक पोलिस ठाण्याचे अधिकारी घाटी रुग्णालयात आले. त्यांनी चालकावर कारवाईचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT