Action on Bullets from the traffic branch of nanded
Action on Bullets from the traffic branch of nanded 
मराठवाडा

वाहतूक शाखेकडून बुलेटवर कारवाई

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील काही बुलेटचालक आपल्या वाहनात फेरबदल करून फटाके आवाजाचे सायलन्सर बसवून ध्वनीप्रदुषण करण्यात येत आहे. अशा बुलेटवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू आहे. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहात या मोहीमेला वेग आला असून दररोज पंधरा ते वीस बुलेटवर कारवाई करण्यात येत आहे. 

बुलेट धारक ही समाजातील सूज्ञ आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून समजली जाते. ती व्यक्ती स्वतःची इमेज जपण्यासाठी बुलेट गाडी वापरते. अशा व्यक्तीकडून मोटार वाहन कायदा मोडून वाहनामध्ये अनाधिकृत बदल करून ध्वनीप्रदुषण करीत सर्वसामान्य जनतेच्या जीवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य करणे योग्य नाही. या सायलेन्सरच्या आवाजाने लहान मुले, गर्भवती माता-भगिनींना, महिलांना, जेष्ठ नागरीकांना आणि आजारी व्यक्तींना खुप त्रास होतो. आम्ही समजदारी म्हणून दंडात्मक कार्यवाही करूनही जर फरक पडत नसेल तर आमच्याकडे भारतीय दंड विधानानुसार दखलपात्र गुन्हा दाखल करून अधिक कडक कार्यवाहीचे मार्ग उपलब्ध आहेत. गुन्हा दाखल झाला तर अटक, जामीन, वाहन जप्ती, वाहनाची आरटीओ तपासणी, दोषारोप आणि शिक्षा या सर्व बाबींचा सामोरं जावं लागेल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी आणि वाहनात केलेला अनाधिकृत बदल काढुन टाकावेत असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे. 

पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनीही या बाबतीत कठोर पाऊले उचलली असून दंड भरण्यास तयार नसलेल्या वाहनधारकांविरूध्द फौजादरी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना वाहतुक शाखेला दिल्या आहे. शहरातील अरुंद रस्ते व गर्दीच्या ठिकाणाहून आपली दुचाकी वेडीवाकडी चालून फटाके फोडत सर्वसामान्यांना त्रास खपवून घेऊ नका. अशा कडक सुचना त्यांनी दिल्याने वाहतुक शाखेकडून अशा वाहनांवर कारवाई सुरू आहे. शहरातील आयटीआय चौक, तरोडा नाका, देगलूर नाका, वजिराबाद चौक या मुख्य चौकात वाहतुक शाखेकडून नाकाबंदी करून अशा वाहनांवर कारवाई केल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT