nanded
nanded 
मराठवाडा

नांदेडमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतुक शाखेने कंबर कसली आहे. मागील पंधरा दिवसात नो एन्ट्रीत घुसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच सहा रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशीक परिवहन विभागाकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

शहरात वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यंनी पदभार घेताच त्यांनी रिक्षा चालकांना नियमीत ड्रेस कोड केला. त्याची अंमलबजावणी रिक्षाचालकांकडून योग्य रित्या होत असल्याचे दिसून येते. तसेच फटाके फोडणाऱ्या बुलेटवर कारवाई करून स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाईवर लगाम लावला. विशेष करून शामनगर ते भाग्यनगर आणि श्रीनगर भागातून स्टंटबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहारत जवळपास सर्वच बुलेटचा फटाका आवाज बंद झाला आहे. 

सोबतच मागील पंधरा दिवसात तारासिंग मार्केट, वजिराबाद या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी नो एन्ट्रीत घुसणाऱ्या 175 वाहनांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून 35 हजाराचा दंड वसूल केला. तसेच बेशिस्त वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करून मागील चार महिण्यात 10 हजार वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास २० लाखाचा दंड वसुल करण्यात आला. 50 हून अधिक फटाके बुलेवर कारवाई केल्याने शहरात आता बुलेटमधून फटाक्याचा आवाज बंद झाला. वाहतुक कोंडी जवळपास संपत आल्याने सध्या शहरात नो एन्ट्री बंद करण्याचा प्रयत्न या शाखेकडून केल्या जात आहे. 

बेशिस्त वाहनचालकांविरुध्द वाहतुक पोलिसानी कारवाई सुरू केली आहे. शहरात आता यापुढे फटाके फोडणारी बुलेट आढळल्यास त्या चालकावर भादवीच्या कलम 291 नुसार गुन्हा दाखल करणार. तसेच त्या परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कदम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT