file photo 
मराठवाडा

Video: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचे कवितेतून जनतेला आवाहन

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी स्वताला घरात अॅसोलेशन करून घेणे गरजेचे आहे. कोणाच्याही संपर्कात येऊ नका, असे आवाहन प्रसिध्द अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांने केले आहे. त्याने स्वता लिहिलेल्या कवितेतून त्यांने लोकांना घरी बसून रहा, असे आवाहन केलेआहे.

हेही वाचा - परभणी जिल्ह्याच्या सीमा बंद !
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. केंद्र व राज्य सरकार त्यांच्या परीने उपाययोजना करत आहे. तर जिल्हा प्रशासनान देखील योग्य ती पावले उचलत आहे. अश्या परिस्थितीत लोकांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. या संदर्भात जनजागृती देखील केली जात आहे. कोरोना विषाणूची लागण होण्यापासून वाचण्यासाठी लोकांनी स्वताच्या घराबाहेर पडता कामा नये असे आवाहन प्रसिध्द अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांने सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.

संकर्षणने केलेल्या कवितेत्या ओळी या प्रमाणे ः 

जातील हे ही दिवस जातील...

खरच मला कळत नाही
आम्ही किती पाप केलेत...
आमच्या देशाच्या नशीबी देवा 
काय शेजारी आलेत...
एक तो नापाक शेजारी सतत शस्त्र उचलतो
दुसरा कोरोनाच्या रुपाने शेट विषाणू बॉम्ब पाठवितो...
या शेजाऱ्यांचे पाप आता
आपल्यालाच निस्तारावी लागतील...
नका काळजी करू तुम्ही
हे ही दिवस जातील....
आता लक्षात आल असेल
निर्सग कसा असतो
त्याच्या समोर आपण फक्त माणुसच असतो...
जात, पक्ष, झेंडा, मोर्चा याने काहीच होत नाही
त्याने केले कायदा की विरोध करून चालत नाही..
यातून बोध घेवून माणसातील माणस बाहेर पडतील...
माणस माणसाच्या साथीने जातील हे दिवस जातील...
उपाय आता एक फक्त धिर धरा
घरी राहून, गर्दी टाळून तुमच्या देवाचे स्मरण  करा...
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitran Transfers: महावितरणात ‘ऑपरेशन ट्रान्सफर’! राज्यभरातील १६ अधीक्षक अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या; कारण काय?

SRH vs RCB : हेनरिच क्लासनचा मोठा पराक्रम! अभिषेक, इशानसह आतषबाजी; उभारली IPL 2026 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

NEET Paper Leak Pune: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार निलंबित; सीबीआयची कारवाई

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT