file photo 
मराठवाडा

आमदारांना पन्नास लाखांचा अतिरिक्त निधी

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नवनिर्वाचित आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. यासाठी आमदारांनी कामाचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा नियोजन विभागातर्फे करण्यात आले आहे.

आमदारांना मिळतो दोन कोटींचा निधी
जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना दरवर्षी त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. यात आमदारांना दोन कोटी, तर खासदारांना पाच कोटी विकासनिधी मिळत असतो. विधान परिषद सदस्य तसेच राज्यसभेच्या सदस्यांना हा निधी मिळतो. यात विकासकामे संबंधित लोकप्रतिनिधींच्या शिफारशीतून केली जातात. हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला जातो.

मागचा निधी आचारसंहितेपुर्वी खर्च
यंदा नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्यामुळे काही ठिकाणी नवीन, तर काही ठिकाणी पुन्हा त्याच लोकप्रतिनिधींना संधी मिळाली. दरम्यान, मागील सरकारच्या काळात मार्च २०१९ नंतर आमदारांना मिळालेला दोन कोटींचा निधी मतदारसंघात खर्च झाल्यामुळे नवनिर्वाचित आमदारांना मार्चनंतर नव्या आर्थिक वर्षात मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा होती.
 
पन्नास लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर
सत्ताधारी महाआघाडी सरकारने नवनिर्वाचित आमदारांना मार्चपर्यंत विकासकामे करण्यासाठी पन्नास लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या अतिरिक्त निधीमुळे आमदारांना दिलासा मिळाला आहे. या निधीतून करावयाच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांनी केले आहे.

आमदार विकासनिधीतून होणारी कामे
आमदार विकासनिधीतून रस्ते, पाणी, शाळा, कुंपण, स्मशानघाट, जलकुंभ, उद्याने, वाचनालये, शालेय साहित्य आणि इतरही तत्सम कामांसाठी लोकप्रतिनिधी या निधीचा वापर करतात. यासाठी आमदारांनी जिल्हा नियोजन विभागाकडे शिफारस करावी लागते. हा निधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मत्री तथा भोकरचे आमदार अशोक चव्हाण, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे, लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर, नायगावचे आमदार राजेश पवार, हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, किनवटचे आमदार भिमराव केराम या नऊ आमदारांना मिळणार आहे.

जिल्ह्यातील नवनिर्वाचित नऊ आमदारांना पन्नास लाखांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. यासाठी त्यांच्याकडून विकासकामांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
- एस. बी. कोलगणे, जिल्हा नियोजन अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटली, 'घड्याळा'वरून वाद; शरद पवारांचा मोठा निर्णय

नवर्षात वाजणार झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक; २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असा असणार...

अग्रलेख - सतरंज्यांचा उठाव

मोठी बातमी! नववर्षात राज्यातील सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाचवेळी होणार पडताळणी; महसूल, शिक्षण विभागाचे असणार अधिकारी; बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश

आजचे राशिभविष्य - 27 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT