hingoli
hingoli 
मराठवाडा

हिंगोली : कृषी सभापतींचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

सकाळवृत्तसेवा

हिंगोली : वसमत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर गाळे बांधकाम करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी गुरुवारपासून (ता.२२) जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. या प्रकारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. 

वसमत शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा आहे. वसमत शहराची मोठी बाजारपेठ असून येथे दररोज परिसरातील सुमारे साठपेक्षा अधिक गावातील गावकरी विविध साहित्य, शेतीमाल खरेदी विक्रीच्या कारणामुळे येतात. त्यामुळे शहरात बाजारपेठ वाढीला मोठा वाव आहे. मात्र व्यापाऱ्यांसाठी व्यापारी गाळे नसल्याने नवीन दुकाने शहराच्या मध्यवर्ती भागात थाटणे कठीण झाले आहे. मात्र याठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर गाळे बांधकाम केल्यास त्यातून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढेल शिवाय व्यापाऱ्यांसाठीही जागा उपलब्ध होऊन त्याचा फायदा शहरातसह तालुक्यातील गावकऱ्यांना होणार आहे. या संदर्भात कृषी सभापती श्री. राखोंडे यांनी मागील एक वर्षापासून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीच्या  बैठकीतही मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालाच नाही.

मागील वेळी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रश्नावर निर्णय झाला नसल्याने त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या श्री. राखोंडे यांनी गुरुवारी (ता.२२) सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत सभापतीच्या प्रश्नांची सोडवणुक होत नसल्याने सर्व सामांन्यांचे प्रश्न कसे सुटतील असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर या उपोषणामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT