कन्नड : बाजार समितीत हमालांनी लिलाव बंद पाडल्याने मका उत्पादक शेतकरी संतप्त झाले होते.
कन्नड : बाजार समितीत हमालांनी लिलाव बंद पाडल्याने मका उत्पादक शेतकरी संतप्त झाले होते.  
मराठवाडा

कन्नड बाजार समितीत मक्‍याचा लिलाव अचानक बंद

संजय जाधव

कन्नड (जि.औरंगाबाद ) ः येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मक्‍याचा लिलाव मंगळवारी (ता.12) दुपारी अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला बाजार समितीला सामोरे जावे लागले. हमालांच्या कामबंदमुळे ही परिस्थिती उद्‌भवल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्‍यातील 60 ते 70 शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर व इतर वाहनांत मका विक्रीसाठी आणलेली होती. त्याचा लिलाव अचानक बंद केला गेला.

त्याबाबत शेतकऱ्यांना न सांगता तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयामध्ये जेव्हा शेतकरी गेले त्या वेळेस फक्त शिपाई त्या ठिकाणी होते. शेतकऱ्यांना दोन ते तीन तास तसेच भरलेले ट्रॅक्‍टरसह लिलाव ठिकाणी उभे करण्यात आले. मात्र एक ते दीड तास झाला तरी कुणीही न आल्याने सर्व शेतकरी एकजूट होऊन बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद केले. त्यानंतर सरळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भरलेले ट्रॅक्‍टर मुख्य रस्त्यावर उभे करून आक्रमक होऊन औरंगाबाद-धुळे महामार्गावर अर्धातास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

याबाबत कन्नड शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी शेतकरी व बाजार समिती अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना शांत करून मक्‍याचा लिलाव पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, कन्नड बाजार समितीत मक्‍याला प्रतिक्विंटल एक हजार ते दीड हजार भाव मिळत आहे. मात्र, लिलाव काही काळ बंद झाल्याने भाव कमी झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी परतीच्या पावसाने व त्याआधी लष्करी अळीने मका पिकाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. सततच्या पावसाने पिके हातात न आल्याने दिवाळी संपली तरी शेतकऱ्यांच्या घरात एक रुपयाही येऊ शकला नाही. त्यात अनेक संकटावर मात करून बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मकासाठी येथे अडचणी निर्माण झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. भविष्यात मका विक्री व्यवहार सुरळीत सुरू राहावेत अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT