Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelan Sakal
मराठवाडा

साहित्य संमेलनात उभारणार यंदा सात व्यासपीठे

सकाळ वृत्तसेवा

उदयगिरी महाविद्यालयात ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यासाठी सात व्यासपीठे उभारण्याची तयारी सुरू आहे.

उदगीर - येथील उदयगिरी महाविद्यालयात (Uadgir Mahavidyalaya) ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) होत आहे. यासाठी सात व्यासपीठे (Platform) उभारण्याची तयारी सुरू आहे. शिवाय जागतिक पातळीवरचा बाल साहित्यिक मेळावाही होणार आहे. यामध्ये जगभरातील बाल साहित्यिकांना ऑनलाइन जोडले जाणार आहे. संमेलनासाठी ४८ समित्या गठीत करण्यात आल्या, अशी माहिती आयोजक संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी दिली.

या संमेलनात सात व्यासपीठांवरून एकाच वेळी सर्व कार्यक्रम सुरू ठेवले जाणार आहेत. मुख्य व्यासपीठावर उद्‍घाटन, समारोप, महत्त्वाचे परिसंवाद, कविसंमेलन, रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अन्य व्यासपीठांवर बाल साहित्यिक मेळावा होईल.

संमेलनासाठी नाशिक येथील अनुभवी, संबंधित विभागाचे नियोजन समिती प्रमुख यांना बोलावून त्यांच्या मार्गदर्शनानुसार दर्जेदार कार्यक्रम पार पाडण्यासाठी आयोजक संस्था प्रयत्न करत आहे. ४८ समित्या गठीत करण्यात आल्या. या माध्यमातून साहित्यप्रेमी, साहित्यिक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशभरातून आलेल्या साहित्यिक, साहित्यप्रेमी व नामांकित व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्यात आली, असेही श्री. नागराळकर यांनी सांगितले.

दिग्गजांना निमंत्रण

उदगीर शहर हे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या राज्यातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संगीतकार अजय-अतुल, अभिनेते अमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक नामवंतांना बोलावण्याचे नियोजन सुरू आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमासह इतर संस्कृतिक कार्यक्रमांचेही नियोजन सुरू असल्याचेही श्री. नागराळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT