Ambajogai hostel students vegetables farming
Ambajogai hostel students vegetables farming 
मराठवाडा

विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्यावर भागते वसतिगृहाची गरज

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई : एकीच्या बळावर कुठलीही गोष्ट साध्य होते हे महात्मा फुले वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी स्वत: श्रमदान करीत परिसरातील १० गुंठ्यात भाजीपाला पिकवला आहे. सध्या याच भाजीपाल्यावर वसतिगृहाची गरज भागविली जात आहे.

येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या परिसरात १९६८ मध्ये हे महात्मा फुले मुलांचे वसतिगृह उभारले गेले. गेली ५० वर्षे पत्र्याच्या खोल्यांतच ते चालत होते. मागील वर्षीच या वसतिगृहाची मोठी इमारत लोकसहभागातून उभी राहिली आहे. या वसतिगृहात राहून शिकलेल्या विद्यार्थ्यांचे त्यात योगदान आहे. या वसतिगृहात अकरावी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणारे २१० गरजू विद्यार्थी राहतात. या वसतिगृहाच्या बाजूलाच जुना पाझर तलाव आहे. या तलावातील पाण्यावरच संस्थेच्या परिसरातील वनराई फुलवली जाते. भाजीपालाही याच पाण्यावर पिकवला जातो.

वसतिगृहाच्या इमारतीसमोर १० गुंठे रिकामी व खडकाळ जमीन आहे. त्यात बाजूच्या तलावातील काळी माती विद्यार्थ्यांनी टाकून घेतली. मे महिन्यात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी या जागेत भाजीपाला लावण्यासाठी जमीन भुसभुशीत करून घेतली. त्यात टोमॅटो, गवार शेंग, वांगे, हिरवी मिरची, भोपळा, पठाडीच्या शेंगा, पालक, शेपू अशा भाज्या लावल्या. तलावात पाणी असल्यामुळे पाण्याचा गरज भागली होती. या पूर्ण भाजीपाल्यासाठी संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी ठिंबकची सोय करून दिली. वसतिगृहाचे अधीक्षक प्रा. राम बडे व प्रा. रमेश सोनटक्के हे स्वत: विद्यार्थ्यांसोबत कार्यरत असतात.

मे अखेर लावलेल्या भाजीपाल्याची ऑगस्टच्या प्रारंभी तोडणी सुरू झाली आहे. त्यामुळे या वसतिगृहाला दररोज विकत घ्यावा लागणारा २० किलो भाजीपाला येथेच उपलब्ध होत आहे. म्हणजेच सध्यातरी भाजीपाल्याच्या बाबतीत हे वसतिगृह स्वावलंबी झाले आहे. तर हिरवं हिरवं गार माझं शेत शिवार अशी कविता संस्थेचे सचिव गणपत व्यास यांनी या भाजीपाल्याच्या बागेवर केली आहे.

सध्या दररोज २० किलो भाजीपाला यातून निघत आहे. त्यातून शिल्लक राहिलेली भाजी, आम्ही संस्थेच्या इतर वसतिगृहाला देतो. भाजीपाल्याची गरज भागू लागल्याने खर्चातही आता बचत झाली आहे.

-प्रा. राम बडे, वसतीगृह अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT