मराठवाडा

युती झाली नाही तर ‘पटक देंगे’ - अमित शहा

सकाळवृत्तसेवा

लातूर - लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली तर सहकाऱ्यांना विजयी करू; पण युती झाली नाही तर त्याच सहकाऱ्याला इतर विरोधकांप्रमाणे आपटू (पटक देंगे), अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिवसेनेवर हल्ला चढविला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळावर लोकसभेच्या सर्व जागा जिंकून दाखवू, असा निर्धार बोलून दाखविला. अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची ही वक्तव्ये शिवसेनेला सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतील भारतीय जनता पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांसाठी ‘बूथ विजय अभियान’ आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शहा यांनी विरोधकांवर टीका करत मित्रपक्षाचेही वाभाडे काढले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री विजय पुराणिक आदी उपस्थित होते.

शहा म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला असा विजय मिळावा, की तो पाहून विरोधकांची हृदयगती थांबली पाहिजे. बारा लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करत आहेत. राफेल प्रकरणात एक पैशाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी टाहो फोडत आहेत.

‘‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हिंदूंच्या मनातील भावना मांडली आणि ‘हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फीर सरकार’ असा नारा दिला तो झोंबल्यामुळेच आणि शिवसेनेने आसूड ओढल्याने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली. आता भाजप नेत्यांच्या जिभाही सरकू लागल्या. भाजपला हिंदुत्व मानणारे नको असेच दिसते आहे,’’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. ‘‘पाच राज्यांच्या निकालांनंतर तसेही भाजपचे अवसान गळले आहेच. भारतीय जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवायला सुरवात केली आहेच. लोकसभेच्या महाराष्ट्रात ४० जागा जिंकण्याची वल्गना करून भाजपने आपली ‘ईव्हीएम’शी युती होणार हे जाहीर केलेच आहे. तसेही त्यांच्या अनिल गोटे या आमदाराने धुळे महापालिकेत यांचे पितळ उघडे केले आहे. आता होऊन जाऊद्या,’’ असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

राज्यात एकहाती सत्ता आणू - मुख्यमंत्री  
युतीबाबत पक्षाध्यक्ष निर्णय घेतील; पण शासनाच्या योजना व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू. तसेच विधानसभेतही सत्ता आणू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘भाजपसाठी २०१९ ची निवडणूक आव्हान आहे, असे काही म्हणत आहेत; पण या निवडणुकीत मोठा विजय मिळणार आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती होवो अथवा न होवो, आपण योजनांच्या लाभार्थींपर्यंत पोचलो तरी राज्यात एकहाती सत्ता मिळवू,’ असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT