Anti Corruption Burau, Udgir
Anti Corruption Burau, Udgir  
मराठवाडा

तीस हजारांची लाच घेताना सरपंच, ग्रामसेवकास पकडले

युवराज धोतरे

उदगीर  (जि.लातूर) : अल्पसंख्याक वस्तीमध्ये केलेल्या कामाचे बिल अदा करण्यासाठी मंगळवारी (ता. ३१) हाळी (ता. उदगीर) येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी तीस हजारांची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. सरपंच, सरपंच पती व ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांनी दिलेली माहिती अशी, की हाळी येथील ग्रामपंचायतीअंतर्गत अल्पसंख्याक वस्तीमध्ये करण्यात आलेल्या विविध विकासकामांची देयके अदा करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी लाचेची मागणी केली. याची संबंधितांनी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची शहानिशा करून मंगळवारी हाळी ग्रामपंचायत येथे दुपारी सापळा रचण्यात आला. संबंधित तक्रारदाराचे तीन लाख ६५ हजार रुपयांचे बिल होते. या बिलाचा धनादेश काढण्यासाठी सरपंच पाच टक्के व ग्रामसेवक पाच टक्के असे एकूण दहा टक्के लाचेच्या रकमेची मागणी केली होती.

शेवटी तडजोडीअंती १५ हजार रुपये सरपंच व १५ हजार रुपये ग्रामसेवक यांना देण्याचे ठरले. तडजोडीत ठरल्याप्रमाणे प्रत्येकी पंधरा हजार रुपये सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले. ती रक्कम त्यांनी स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले. यावेळी या पथकाने सरपंच प्रज्ञा कांबळे, ग्रामसेवक परशुराम गायकवाड व सरपंच पती दयानंद कांबळे या तिघांना ताब्यात घेतले आहे. या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बेंद्रे, पोलिस निरीक्षक कुमार दराडे, मोहन सुरवसे, रूपाली भोसले, शिवा कच्छवे, श्री. महाजन यांचा समावेश होता.

हेही वाचा ः  आधी पिकांवर आता गावांवर फवारणी, निर्जंतुकीकरण; हायड्रोक्लोराईडची मागणी वाढली

घराचीही घेतली झाडाझडती
सरपंच व ग्रामसेवकांना पकडल्यानंतर सरपंच यांच्या हाळी येथील, तर ग्रामसेवक यांच्या अहमदपूर येथील निवासस्थानाची झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची रीतसर फिर्याद वाढवणा पोलिस ठाण्यात देण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक बेंद्रे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT